अखेर ‘त्या’ कामगारांना मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:04 AM2017-11-23T00:04:35+5:302017-11-23T00:05:07+5:30
सिएसटीपीएसमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळत नव्हते.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : सिएसटीपीएसमध्ये काम करणाºया कंत्राटी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन मिळत नव्हते. विदर्भ प्रहार कामगार संघटनेने पाठपुरावा केल्याने या कामगारांना न्याय मिळाला आहे. वेतनातील फरकाची रक्कम कामगारांना मिळणार आहे. त्यामुळे १३ कामगार कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
सीएसटीपीएस येथील अभि. इंजिनिअरिंगच्या कामगारांना विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासन निर्धारित किमान वेतन दराने वेतन मिळवून देण्यात यश मिळाले आहे. १३ कामगार सात ते आठ वर्षांपासून अभि. इंजिनिअरिंगमध्ये कार्यरत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी किमान वेतनाची मागणी केल्यामुळे आस्थापनेने त्यांना कामावरुन बंद केले. त्यामुळे सर्व कामगारांनी न्याय मिळविण्यासाठी विदर्भ प्रहार कामगार संघटनेकडे धाव घेतली.
जवळपास वर्षभर चालू असलेल्या कागदेशीर कारवाईमुळे बुधवारी सहायक कामगार आयुक्त आर. गुल्हाणे (प्रभारी) यांच्या मध्यस्थीने अभि.इंजिनिअरिंगमधील कमी केलेल्या कामगारांना किमान वेतन दराने वेतन मिळवून देणे शक्य झाले.
कामगारांना किमान वेतन दराप्रमाणे वेतन आणि अनेक आर्थिक लाभ मिळाल्यानेकामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती अॅड. हर्षल चिपळूणकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.