आठवडी बाजार बंदमुळे आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:28+5:302021-07-16T04:20:28+5:30
सर्व आस्थापना सुरू करण्यात आल्या असून केवळ आठवडी बाजारातील निर्बंध कायम ठेवल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान ...
सर्व आस्थापना सुरू करण्यात आल्या असून केवळ आठवडी बाजारातील निर्बंध कायम ठेवल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही तालुक्यांत आठवडी बाजार भरत आहे. सिंदेवाही व नवरगाव आठवडी बाजार बंद आहेत. तालुक्यातील भाजीपाला उत्पादक, फळ विक्रेते, दैनंदिन वापराच्या वस्तू विकणारे छोटे व्यावसायिक यामुळे अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील रोजमजुरीवरच उदरनिर्वाह असणारा कामगार वर्ग, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आठवडी बाजारातून बऱ्याच वस्तू खरेदी करतो. एका दिवसाच्या आठवडी बाजारातून मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे आठवडी बाजार बंद केला. लाट ओसरली तरी तो बंदच आहे. कोरोनाचे नियम व वेळेचे बंधन घालून आठवडी बाजार सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी छोटे भाजीपाला विक्रेते व शेतकऱ्यांनी केली आहे.