ऑटोचालकांना आर्थिक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:26+5:302021-06-03T04:20:26+5:30
आहे. मोकाट प्राण्यांची उपासमारी चंद्रपूर : कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. परिणामी मोकाट प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली ...
आहे.
मोकाट प्राण्यांची उपासमारी
चंद्रपूर : कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ बंद आहे. परिणामी मोकाट प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था त्यांना खाऊ घालत आहे. बिस्किट देत आहेत. मात्र शहरातील अनेक भागात जनावरे अन्नाची शोधाशोध करीत फिरत असतांना दिसून येत आहेत.
मार्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या घटली
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांना घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले. असे असले तरी अनेकजण मार्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत होते. दरम्यान, प्रशासनाने कडक अमंलबजावणी सुरू केल्यामुळे ही संख्या घटली आहे.
विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष
चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षीही परीक्षा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी पुढील वर्गात गेले आहे. दरम्यान, दहावीचीही परीक्षा झाली नाही. त्यामुळे त्यांना नवव्या वर्गातील प्रात्यक्षिक तसेच अन्य बाबींवरून गुण देऊन निकाल लावण्यात येणार आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.
सोशल डिस्टन्स ठेवून शेतीचे कामे सुरू
चंद्रपूर : पावसाळा अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहे. मात्र कोरोनाची दहशत असल्याने सोशल डिस्टन्स पाळून शेतात काम करीत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे, काही ग्रामपंचायतीने जनजागृती करीत स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे.
चित्रपट शौकिनांची झाली निराशा
चंद्रपूर : कोरोनामुळे सर्वच बंद झाले. त्यामुळे सिनेमागृहसुद्धा बंद करण्यात आले आहे. मात्र सिनेनागृहात जाऊन चित्रपट बघणाऱ्यांची निराशा होत आहे. त्यामुळे ते आता टीव्हीवर जुने चित्रपट बघून आपली हौस भागवित असल्याने दिसत आहे.
एटीएमध्ये रक्कम नसल्याने आर्थिक कोंडी
चंद्रपूर : शहरातील बऱ्याच बँकांचे एटीएम बंद करण्यात आल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होत आहे. कोरोनामुळे बँकांमध्ये प्रचंड गर्दी आहे. नागरिकांना आर्थिक गरजा भागविण्यासाठी पैशांची गरज आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएममध्ये पैसे नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने एटीएममध्ये पैशांची व्यवस्था करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
बियाणे घेताना काळजी घ्या
चंद्रपूर : सध्या शेतकरी खरीब हंगामाची तयारी करीत असून बी-बियाणे खरेदीही करीत आहे. मात्र चोर मार्गाने बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे घेताना दक्षता बाळगून बिल घेतल्याशिवाय बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.