कॉम्प्युटर क्लास संचालकांचे आर्थिक गणित कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:10+5:302021-06-04T04:22:10+5:30
बल्लारपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मागील वर्षी २२ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली होती. सरकारच्या आदेशानुसार राज्यभरातील कॉम्प्युटर ट्रेनिंग ...
बल्लारपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मागील वर्षी २२ मार्चपासून देशभरात संचारबंदी लागू केली होती. सरकारच्या आदेशानुसार राज्यभरातील कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर हे मागील वर्षाच्या २२ मार्चपासून अनिश्चित कालावधीसाठी बंद आहेत. तसेच उन्हाळ्याच्या सुटीत त्या काळात क्लासेस बंद झाल्याने क्लास संचालकांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
कोलमडलेले आर्थिक गणित सुधारण्यासाठी क्लासेस पुन्हा कधी सुरू होतील, या प्रतीक्षेत संचालक व विद्यार्थी आहेत. सरकारी खासगी क्षेत्रात साधारणता सर्वच ठिकाणी संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यासाठी दहावी व बारावीनंतर केंद्र शासनाच्या सीसीसी व राज्य शासनाच्या एमएससीआयटी या कोर्सच्या परीक्षा पास होणे बंधनकारक आहे. त्यामुळे दहावी - बारावीच्या परीक्षा संपताच पालक आपल्या पाल्यांना या कोर्सेसकरिता प्रवेश घेत असतात. मात्र, मागील वर्षी २२ मार्चपासून या संगणक क्लासेसवर शासनाने बंधने लावली. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या परीक्षा देता येत नाहीत. राज्यात जवळपास पाच हजाराच्या वर क्लासेस आहेत. या क्लासेसमध्ये प्रत्येक वर्षी लाखाेंच्यावर विद्यार्थी प्रवेश घेतात. उन्हाळ्याच्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या संगणक क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. संचालकांच्या वार्षिक उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पादन या मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान होत असते. या तीन महिन्यांच्या आधारे हे वर्षभर आपले क्लासेस चालवतात. परंतु मागील दोन वर्षांपासून संगणक क्लासेस बंद असल्यामुळे संचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
कोट
साधारणपणे सर्व संगणक संचालकांचे क्लासेस भाडेतत्त्वावर उपलब्ध असलेल्या जागेवर सुरू आहेत. शिक्षकांचे वेतन आणि दुरुस्ती देखभाल याचा खर्च, वीजबिल, कर्जाचे हप्ते असे अनेक खर्च चालू आहेत. क्लासेस बंद असल्यामुळे हे खर्च संचालकांना आता परवडेनासे झाले आहेत. क्लासेस सुरू होण्याची शाश्वती नसल्याने बँकांचे हप्ते कसे भरायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आमच्या समोर आहे.
- सुनील दालवनकर, संचालक
मायक्रोसॉफ्ट कॉम्प्युटर एज्युकेशन, बल्लारपूर.
===Photopath===
030621\img-20210522-wa0006.jpg
===Caption===
कॉम्प्युटर क्लास संचालकांचे आर्थिक गणित कोडमडले