पॅसेंजर गाड्या बंद रेल्वे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:17+5:302020-12-26T04:23:17+5:30
चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने रेल्वे स्थानकावरही ...
चंद्रपूर तसेच बल्लारपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश रेल्वे थांबतात. मात्र आता काही विशेष गाड्यांशिवाय अन्य रेल्वे धावतच नसल्याने रेल्वे स्थानकावरही शुकशुकाट बघायला मिळत आहे. बल्लारपूर येथून बल्लारशा- गोंदिया, बल्लारशहा वर्धा या पॅसेंजर धावतात. मात्र लाॅकडऊनपासून या रेल्वे गाड्या बंद आहे. परिणामी अनेकांचे रोजगारही बुडाला आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी ३०० ते ४०० रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे नुकसान होत आहे. या मार्गाने निममीत प्रवास करणारे प्रवासी आता रेल्वे सुरु होण्याची प्रतीक्षेत आहे.
----
बाॅक्स
या विशेष गाड्या सुरु
सध्या स्थितीत जीटी, तामिलनाडयू, चेन्नई-दिल्ली, आंध्रप्रदेश एक्सप्रेस
००००
गरीब प्रवाशांची फरफट
बल्लारशहा-गोंदिया, बल्लारशहा- वर्धा या प्रवासासाठी लोकल गाडी आहे. मात्र त्याही बंद असल्यामुळे प्रवाशांना या गावातील प्रवासासाठी ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गोंदिया तसेच अन्य ठिकाणाहून येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात माल आणतात. मात्र आता त्यांना अन्य वाहनाने प्रवास तसेच मालाची वाहतूक करावी लागत असल्यामुळे अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.
---
बाॅक्स
बल्लारपूर-गोंदिया, बल्लारपूर वर्धा पॅसेंजर बंद
मागील आठ ते नऊ महिन्यापासून बल्लारपूर- गोंदिया तसेच बल्लारपूर वधार् ही पॅसेंजर बंद आहे. परिणामी या मागार्वरील दररोज प्रवास करमाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसत आहे. बसने प्रवास करवा लागत आहे. त्यामुळे नाहर आर्थिक फटका बसत आहे.
---
कोट
कोरोनामुळे सर्वच रेल्वे गाड्या बंद होत्या. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने पॅसेंजर सुरु करून सामान्य प्रवाशांना दिलासा द्यावा. जेणेकरून या प्रवाशांना आर्थिक फटका बसणार नाही.
-०तततत
प्रवासी संघटना, बल्लारपूर