वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:47+5:302021-07-01T04:20:47+5:30
यावेळी मूल पंचायत समितीच्या सदस्य वर्षा लोनबले, चिचपल्ली वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर, जानाळाच्या सरपंच रंजना भोयर, पोलीस पाटील ...
यावेळी मूल पंचायत समितीच्या सदस्य वर्षा लोनबले, चिचपल्ली वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर, जानाळाच्या सरपंच रंजना भोयर, पोलीस पाटील दर्शना गेडाम, वनरक्षक राकेश गुरूनुले, गारम पंचायत सदस्य विनायक निकोडे, सामाजिक कार्यकर्ते भूमेश गेडाम आदी उपस्थित होते.
प्रादेशिक वनविभागाचे मोठे जंगल जानाळा परिसरात आहे. मागील महिन्यात शेतीच्या कामावर गेलेल्या जानाळा येथील किर्तीराम कुळमेथे यांना वाघाने जागीच ठार केले, बुधवारी त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. तर आगडी येथील कल्पना नामदेव वाढई ही महिला मोहफूल तोडण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर झडप घेऊन जागीच ठार केले, बुधवारी त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाखांचा धनादेश मूल पंचायत समितीच्या सदस्य वर्षा लोनबले, वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजुरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.