वरोरा क्षेत्रात महिलांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:00 AM2019-10-12T06:00:00+5:302019-10-12T06:00:40+5:30
यावेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वरोरा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारीही उपस्थित होते. खापरी- टाकळी येथील महिलांनी गावात रस्ते, नाल्या, पाणी आदी समस्या असल्याचे सांगितले. काही गावातील महिलांनी रोजगाराच्या समस्या असल्याचे सांगून गावातील बेरोजगार असलेल्या तरुणांच्या हाताला काम देण्याची मागणीही यावेळी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा विधानसभा क्षेत्रातील चिकणी, डोंगरगाव, एकोना, चरुरखटी, खापरी-टाकळी, नांद्रा आदी गावांमध्ये वरोरा विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश राजूरकर यांनी भेट देत समस्या जाणून घेतल्या. यावेळी महिलांनी गावातील समस्यांचा पाढाच वाचला.
रस्ते, नाल्या, पाणी, आरोग्य एवढेच नाही, तर रोजगाराच्या समस्याही मोठ्या प्रमाणात असल्याचे राजुरकर यांना सांगितले. या सर्व गावातील समस्या ऐकून घेत त्या कोणत्याही परिस्थिीत सोडविण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी या महिलांना दिला. आपण राजकारणी नाही. मात्र समाजातील समस्यांची जाण असल्यामुळे तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वरोरा विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारीही उपस्थित होते.
खापरी- टाकळी येथील महिलांनी गावात रस्ते, नाल्या, पाणी आदी समस्या असल्याचे सांगितले. काही गावातील महिलांनी रोजगाराच्या समस्या असल्याचे सांगून गावातील बेरोजगार असलेल्या तरुणांच्या हाताला काम देण्याची मागणीही यावेळी केली. दरम्यान, वरोरा शहरातील विविध भागात मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मनसेचे उमेदवार रमेश राजूरकर यांच्या अर्धांगिनी माया राजूरकर यांनी विविध प्रभागात मिरवणुकीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला. महिलांकडून विशेष प्रतिसाद मिळाला. अनेक मतदारांनी शहरातील समस्यासंदर्भात अवगत करून दिले. मालवीय वार्ड, बोर्डा, कर्मवीर वार्डसह शहरातील बहुतांश वार्डासह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीही घेतल्या. भद्रावती शहरातील विविध संस्था, पदाधिकाऱ्यांची मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट घेत संपर्क साधला.