चंद्रपुरात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १२०० रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:29 AM2021-05-11T04:29:46+5:302021-05-11T04:29:46+5:30
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. पण अनेक जण सर्रास थुंकतात. विनामास्क फिरतात. अशावेळी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी ...
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. पण अनेक जण सर्रास थुंकतात. विनामास्क फिरतात. अशावेळी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोविडचे विषाणू हवेत पसरून रोगराई पसरण्याची भीती असते. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या नियमावलीत सोशल डिन्स्टन्सिंग राखणे, हात साबणाने वारंवार धुणे आणि मास्कचा वापरणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालणे व मास्कची सवय लावण्यासाठी मनपाने कठोर पाऊल उचलले. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना कायदेशीर तरतुदीनुसार केवळ २०० रुपयांऐवजी १२०० रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना न्यायालयाने ७ एप्रिल २०२१ रोजी दिल्या होत्या. मदत व पुनर्वसन विभागाच्या २७ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये थुंकणे व विनामास्क याबाबत कठोर दंड वसूल करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चे संरक्षण करणे आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.