विनामास्क फिरणाऱ्या २२६ जणांकडून ४३ हजार ४०० रुपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:15+5:302021-02-27T04:37:15+5:30
जनजागृतीसाठी सरकारी अधिकारी रस्त्यावर बल्लारपूर : कोरोनाचा वाढता वेग पाहून बल्लारपुरात प्रतिबंधक उपाय म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगरपरिषद, तहसील ...
जनजागृतीसाठी सरकारी अधिकारी रस्त्यावर
बल्लारपूर : कोरोनाचा वाढता वेग पाहून बल्लारपुरात प्रतिबंधक उपाय म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नगरपरिषद, तहसील कार्यालय व पोलीस विभागाच्या साहाय्याने शहरातील विविध संस्थांना भेटी देऊन कोरोनाविषयक नियमावलीचे पालन होत आहे किंवा नाही, याची पाहणी सुरू असून, सरकारी अधिकारी रस्त्यावर उतरून जनजागृतीच्या कामात लागले आहे.
या मोहिमेत १९ ते २४ फेब्रुवारीपर्यंत ग्रामीण व शहरी विभागात विनामास्क फिरणाऱ्या २२६ जणांकडून ४३ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार संजय राईंचवार, ठाणेदार उमेश पाटील स्वतः हजर होते, तसेच नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी अभिजीत मोटघरे, कर्मचारी संजय बोज्जा, शंकर तांड्रा,व कर्मचारी वाहतूक शाखेचे नीलेश माळवे व कर्मचारी मोहिमेत सहभागी आहेत.