अर्धे शटर उघडून दुकान सुरू ठेवणाऱ्यांकडून ९३ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:29 AM2021-05-13T04:29:08+5:302021-05-13T04:29:08+5:30
चंद्रपूर : ‘अत्यावश्यक सेवा’वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा सकाळी ११ वाजतानंतर बंद ठेवण्याचे निर्देश असताना शहरातील १२ व्यावसायिकांनी ...
चंद्रपूर : ‘अत्यावश्यक सेवा’वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा सकाळी ११ वाजतानंतर बंद ठेवण्याचे निर्देश असताना शहरातील १२ व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने बुधवारी मनपाने ९३ हजारांचा दंड वसूल केला.
शहरात दुपारी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. परंतु दिलेल्या वेळेनंतर सुरू असलेल्या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. यात सोसायटी ट्रेडर्सवर २० हजार, गुगोल कलेक्शन १० हजार, श्री गणेश साडी सेंटर ८ हजार, डायमंड ग्लास ५ हजार, अनिकेत जैन ५ हजार, नयन बडवाईक २ हजार, रमेश मून ५ हजार, शिवशक्ती प्रिंटिंग प्रेस १५ हजार, सिकटेक टाईल्स १५ हजार, बेले हार्डवेअर २ हजार, पीयूष अग्रवाल ३ हजार, शशांक अग्रवाल ३ हजार असे एकूण ९३ हजार रुपयांचा दंड मनपाने वसूल केला. शहरातील व्यापारी दुकानाचे अर्धे शटर लावून व्यापार करताना आढळले. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशांनुसार उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांच्यासह झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, पंचभुते व झोन २ कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.