ललित लिहिणे म्हणजे सांस्कृतिक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:20 PM2019-01-29T23:20:28+5:302019-01-29T23:20:43+5:30

ललित लेखन करण्यासाठी मोठी दृष्टी लागते. लालित्य हे जीवन जगण्यासाठीच मुख्य साधन आहे. सहा ललित पुस्तके एकाचवेळी लोकार्पण होणे, हे आनंददायी तर आहेच. पण त्यामुळे हा लेखक आकृतीबंधात मावत नाही. तो ओसंडून वाहतो आहे.

Fine writing is cultural | ललित लिहिणे म्हणजे सांस्कृतिक ठेवा

ललित लिहिणे म्हणजे सांस्कृतिक ठेवा

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीपाद भालचंद्र जोशी : ग्रंथसंपदेवर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ललित लेखन करण्यासाठी मोठी दृष्टी लागते. लालित्य हे जीवन जगण्यासाठीच मुख्य साधन आहे. सहा ललित पुस्तके एकाचवेळी लोकार्पण होणे, हे आनंददायी तर आहेच. पण त्यामुळे हा लेखक आकृतीबंधात मावत नाही. तो ओसंडून वाहतो आहे. यामुळे ेललित लेखन हा एकसांस्कृतिक व सामाजिक ठेवा आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत, व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात सूर्यांश साहित्य मंचाच्या वतीने डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या सहा पुस्तकांचे प्रकाशन व चर्चासत्रात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी लेखक व कादंबरीकार डॉ. रविंद्र शोभणे, प्राचार्य डॉ राजेश इंगोले, समीक्षक डॉ. शैलेंद्र्र लेंडे, डॉ. इसादास भडके, डॉ. श्याम मोहरकर, डॉ. धनराज खानोरकर, डॉ. राज मुसणे, डॉ. विद्याधर बन्सोड, डॉ. संजय लाटेलवार आदी उपस्थित होते. डॉ. जोशी यांनी मराठी साहित्यातील विविध प्रवाहांवर भाष्य केले. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लेखन पुढे येत असल्याचे त्यांनी नमुद केले. ‘मुक्काम पोस्ट तेढा’ कादंबरीवर डॉ मुसणे यांनी विचार मांडले तर ‘होरपळ’ स्वकथनावर डॉ. खानोरकर यांनी भाष्य केले. प्राचार्य, डॉ. इंगोले यांनीही साहित्याचे सामर्थ्य विषद केले. डॉ लेंडे, डॉ. मोहरकर यांनी 'टोला' कादंबरीवर विचार मांडले. डॉ. इसादास भडके यांनी 'दलित साहित्याचे वैचारिक अधिष्ठान यातील मर्मस्थळे उलगडली.
उपस्थित अभ्यासकांनी मराठी कादंबरी, त्यातील आशयबंध, सादरीकरण, सामाजिक भूमिका, समकालिन वास्तव आदी पैलुंवर विचार मांडले. प्रास्ताविक सूर्यांश मंचाचे अध्यक्ष इरफान शेख, संचालन डॉ. लाटेलवार यांनी केले. प्रदीप देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्रीपाद प्रभाकर जोशी, सुदर्शन बारापात्रे ना. गो. थुटे, डॉ. हिरा बनपूरकर, डॉ. पद्मरेखा धनकर, गीता रायपुरे, संजय वैद्य, काटकर, डॉ. कांडनगीरे उपस्थित होते.

Web Title: Fine writing is cultural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.