बल्लारपूर पालिकेच्या अग्निशमन पथकाने दोन वर्षांत ३८ ठिकाणची आग विझविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:29 AM2021-01-25T04:29:45+5:302021-01-25T04:29:45+5:30
अग्निशमन दलाने २०१९ या वर्षी १८ ठिकाणी जाऊन आग विझविण्याचे काम केले. यात बल्लारपूर तालुक्यातील उमरी, एफडीसीएम आगारातील आग, ...
अग्निशमन दलाने २०१९ या वर्षी १८ ठिकाणी जाऊन आग विझविण्याचे काम केले. यात बल्लारपूर तालुक्यातील उमरी, एफडीसीएम आगारातील आग, कोठारी राईस मिलची आग, विसापूरच्या शेतात तणसाला लागलेली आग, गोंडपिपरी, सास्ती मानोरा इत्यादी ठिकाणी आगी विझविल्या तर २०२० मध्ये १२ महिन्यांत २० ठिकाणच्या आगी विझविल्या. यात अनेक ठिकाणी आगी विझविताना फायर मॅनला संघर्ष करावा लागला. याबाबत सांगताना अग्निशमन दलाचे दायमा म्हणाले, मानोरा येथील शेतात लागलेली आग विझविण्यासाठी घटनास्थळी जाण्यासाठी रस्ताच नव्हता. पाणी कुठून आणावे हा प्रश्न सोडविताना मोठी कसरत करावी लागली. याशिवाय बल्लारपुरात अनेक घरांत गॅस सिलिंडर भडकण्याच्या आगीला शांत करण्यास अग्निशमन दलाची टीम यशस्वी झाली. भंगाराम तळोधी, आक्सापूर, गोंडपिपरीला जाऊनही आगी विझविल्या.
बॉक्स
बल्लारपुरात आग विझविणे कठीण काम
शहरातील वस्ती विभाग व डेपो परिसरात दाट वस्ती व जवळ जवळ घरे असल्यामुळे घर किंवा इमारतीला आग लागल्यास अग्निशमनच्या मोठ्या गाडीला त्या ठिकाणी जात येत नाही. त्यामुळे गल्लीत जाणारी लहान अग्निशमनच्या गाडीची आवश्यकता आहे.
कोट
जिल्ह्यात कुठेही लागलेल्या आगी विझविण्याचे काम नगर परिषद अग्निशमनची गाडी मोबदल्याची अपेक्षा न ठेवता करीत आहे. घटनास्थळी जाण्यासाठी आधी गाडीत डिझेल भरावे लागते व झालेला खर्च मिळणारच याची शास्वती नसते. तरीही नगर परिषद हे जनसेवेचे काम तत्परतेने करीत आहे.
- जयवंत काटकर, उपमुख्याधिकारी, नगर परिषद, बल्लारपूर