नवेगाव (लोनखेरी) येथे अचानक लागते आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:54+5:302021-01-21T04:25:54+5:30
मागील पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने नागरिक सांगत आहे. सिंदेवाही येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व पोलीस निरीक्षक ...
मागील पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने नागरिक सांगत आहे. सिंदेवाही येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व पोलीस निरीक्षक घारे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलीस ठाण्याला अद्याप एकही तक्रार नाही. मंगळवारी काही शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी सिंदेवाही पोलिसांना निवेदन दिले. या आगीत सुरेश कोठेवार, किशोर कोठेवार या शेतकऱ्यांची वेगवेगळ्या दिवशी असलेली धानाची तणस जळाली आहे. ही आग समाजकंटकाकडूनच लावली जात असल्याचा संशय आहे. राजोली मांत्रिकाच्या माध्यमातून हा सर्व प्रकार घडत असावा असे गावातील काही सुजाण नागरिक बोलत आहेत.
कोट
नवेगाव आगीच्या संदर्भात पोलीस पाटलांनी तोंडी माहिती दिली. गावात भेट देऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरिक तक्रार देण्यास तयार नाहीत. गावात रात्र गस्त सुरू केली आहे. वेळ पडल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून प्रबोधनाचा कार्यक्रमसुद्धा घेण्यात येईल.
- योगेश घारे, पोलीस निरीक्षक, सिंदेवाही.
नवेगावला भेट दिली असता घरांना आग लागल्याचे आढळले. ती मानवनिर्मित असण्याची शक्यता आहे. गावातील नागरिकांमध्ये अंधश्रद्धा वाढत आहे. तंत्र-मंत्राने आग लावता येत नाही. केमिकलच्या माध्यमातून आग लावली जात असावी असा संशय आहे.
- मोरेश्वर गौरकर, सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सिंदेवाही