आगीत बिछायत केंद्रातील साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 10:36 PM2019-01-02T22:36:21+5:302019-01-02T22:37:22+5:30
सिंदेवाही नगरातील इलेक्ट्रीक दुकानचे मालक प्रतिष्ठीत व्यापारी योगेश बाबुराव तालेवार यांच्या राहते घरी असलेल्या गोडावूनमध्ये शार्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : सिंदेवाही नगरातील इलेक्ट्रीक दुकानचे मालक प्रतिष्ठीत व्यापारी योगेश बाबुराव तालेवार यांच्या राहते घरी असलेल्या गोडावूनमध्ये शार्ट सर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत त्यांचे एकूण ३२ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस पंचनाम्यानुसार सांगण्यात येत आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.
योगेश तालेवार यांचे चंद्रपूर रोडवर दसरा चौकात इलेक्ट्रीक व डेकोरेशन आणि बिछायत केंद्र असून ते तेथेच वरच्या माळ्यावर आपल्या कुटुंबीयासह राहतात. खालच्या भागात त्यांचे गोडावून असून तेथे त्यांचे इलेक्ट्रिकचे सामान, बिछायत केंद्र, गाद्या, खुर्ची तसेच इतर सामान होते. पहाटेच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गोडावूनमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी तालेवार यांना याची माहिती दिली. तेव्हा गोडावूनला आग लागल्याचे लक्षात आले. तालेवार कुटुंबीय व नागरिकांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गोडाऊनमधील बरेच साहित्य जळून खाक झाले होते.