वडसी येथे आगीचे तांडव

By admin | Published: June 2, 2016 02:36 AM2016-06-02T02:36:36+5:302016-06-02T02:36:36+5:30

चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या वडसी येथील रवी सखाराम मेश्राम व दिगांबर सखाराम मेश्राम यांच्या घराला व गोठ्याला ...

Fire extinguisher at Vadsi | वडसी येथे आगीचे तांडव

वडसी येथे आगीचे तांडव

Next

दोन घरे जळाली : गावकऱ्यांच्या मदतीने मोठा अनर्थ टळला
नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या वडसी येथील रवी सखाराम मेश्राम व दिगांबर सखाराम मेश्राम यांच्या घराला व गोठ्याला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या दोघांचीही घरे गावाच्या मधोमध असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी एकसंघ होऊन पाण्याची व्यवस्था करीत भगीरथ प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वडसी या गावाच्या मधोमध रवींद्र मेश्राम व त्यांचे मोठे भाऊ डॉ. दिगांबर मेश्राम यांच्या घराला अचानक आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने क्षणार्धात उग्ररुप धारण केले. आग पसरत जाऊन अनेक घरांना आपल्या कवेत घेईल, या भीतीने नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली. गावातील महिला, पुरुष मुले-मुली सर्वांनी मिळेल तिथून पाण्याची सोय आग विझविण्यासाठी केली. गावातील पूर्ण बोअरवेल बंद असून विहिरी कोरड्या आहेत. तरीही आगीवर नियंत्रण आणण्याकरिता गावकऱ्यांनी अटीतटीचे प्रयत्न केले.
गोठ्यालाही आग लागल्याने गोठ्यातील जनावरांनी पळ काढला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या गोठ्यामध्ये वाड्यातील संपूर्ण जनावरांचा चारा, शेतीचे साहित्य, धान्य, असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला. गावात पाणी मुबलक नसल्याने गावातील लोकमतचे वार्ताहर नितीन पाटील यांनी ठिकठिकाणी संपर्क साधून आग विझविण्याकरिता टँकर बोलावले. त्यामुळे आग विझविण्याकरिता मोठी मदत झाली. वृत्त लिहिपर्यंत आगची धग चालूच होती. घटनास्थळाला भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. शिवरकर, डॉ. हटवादे यांनी भेट देऊन टँकरची व्यवस्था करून दिली. (वार्ताहर)

Web Title: Fire extinguisher at Vadsi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.