आगीत जनावरंचा गोठा भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2017 01:07 AM2017-04-22T01:07:50+5:302017-04-22T01:07:50+5:30

कोरपना तालुक्यातील कढोली(खु) येथे एका शेतातील गोठा गुरूवारी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला.

Fire in the flames of the animals | आगीत जनावरंचा गोठा भस्मसात

आगीत जनावरंचा गोठा भस्मसात

googlenewsNext

दोन लाखांचे नुकसान : सिंचनाचे साहित्यही जळाले
आवारपूर : कोरपना तालुक्यातील कढोली(खु) येथे एका शेतातील गोठा गुरूवारी अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कढोली येथील सधन शेतकरी नामदेव ढेंगळे यांच्या शेतात माल साठविण्यासाठी व जनावरांसाठी त्यांनी गोठा तयार केला होता. परंतु गुरूवारी अचानक या गोठ्याला आग आगली. त्यात संपूर्ण गोठा हा भस्मसात झाला. या घटनेत जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत गोठ्यातील जनावरांची सुटका केली. मात्र त्यात असलेले शेतीची अवजारे व सिंचनाचे साहित्य, ओलिताची पाईप लाईन पूर्णत: जळून खाक झाली.
आगीमुळे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. जनावराच्या चाऱ्याचे आणि ओलीताच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने ढेंगळे यांच्यावर संकट कोसळले आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. आगीचे कारण कळू शकले नाही. या आगीमुळे भोवतालचे शेतकरीसुद्धा भयभीत झाले होते. काही दिवसातच शेतीचा हंगाम चालू होत आहे. परंत त्यांना शेतीचे अवजारे व ओलिताची साहित्य घ्यावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नामदेव ढेंगळे व गावकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Fire in the flames of the animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.