आगीत गोदाम जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:47 PM2018-10-19T22:47:22+5:302018-10-19T22:47:39+5:30
बल्लारपूर तालुक्यातील कळमणा येथील रेहाण स्क्रब गोदामाला बुधवारी रात्री १० वाजता अचानक आग लागल्याने जळून खाक झाले. आगीत लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमना : बल्लारपूर तालुक्यातील कळमणा येथील रेहाण स्क्रब गोदामाला बुधवारी रात्री १० वाजता अचानक आग लागल्याने जळून खाक झाले. आगीत लाखोचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बल्लारपुरातील शेख बबुभाई यांनी स्क्रब व्यवसायाकरिता कळमना येथे पाच वर्षांपूर्वी गोदाम बांधला. यामध्ये लाखो रूपयांचे साहित्य साठवून ठेवण्यात आले आहे. गोदामात ४०-४५ मजूर कार्यरत असत सदर गोडावूनला अचानक आग लागून धंदा उद्ध्वस्त झाल्याने मालक शेख बबुभाई हतबल झाला आहे. अग्निशामक दलाने आग विझविण्याचे प्रयत्न केले. परंतु आग भयानक असल्याने आटोक्याबाहेर झाले. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र शेजारी शेतकऱ्यांचे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे प्रत्यक्ष पाहिणीत दिसून अलो. आगीचे कारण कळू शकले नाही.