कढोली येथे आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:45 PM2018-05-04T23:45:47+5:302018-05-04T23:45:47+5:30

तालुक्यातील कढोली गावालगत असलेल्या तणसाच्या सुमारे २० ते २५ ढिगाऱ्यांना आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Fireball at Kadoli | कढोली येथे आगीचे तांडव

कढोली येथे आगीचे तांडव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : तालुक्यातील कढोली गावालगत असलेल्या तणसाच्या सुमारे २० ते २५ ढिगाऱ्यांना आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कढोली गावाच्या बाहेर दरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांनी गुराच्या चाऱ्याची सोय म्हणू तणसाचे ढिगारे तयार करुन ठेवले होते. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने ही संपूर्ण परिसरात पसरली. यात जवळपास २५ ते ३० शेतकऱ्यांचे तणसाचे ढीग जळून खाक झाले. आग गावाच्या दिशेने कुच करीत होती.
आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी गावात पोहोचले. पुढील अनर्थ घडू नये म्हणून गावकºयांना गावाच्या बाहेर एक किमी अंतरावर नेऊन ठेवण्यात आले. लगेच अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आल्याने गडचिरोली आणि मूल येथून आग विझविण्याचे बंब बोलाविण्यात आले. तोपर्यंत संपूर्ण ढिगाºयांना आग लागली होती. दरम्यान जि.प. प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीमुळे आग गावापर्यंत पोहचू शकली नाही. त्यानंतर अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थाळी सावलीच्या तहसीलदार उषा चौधरी, ठाणेदार स्वप्नील धुळे व त्यांचे सहकारी तसेच वनविभागाचे व्याहाड खुर्द येथील क्षेत्रसहाय्यक बुरांडे, वनरक्षक शंकर देठेकर, तलाठी व गावकºयांची उपस्थिती होती.

Web Title: Fireball at Kadoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.