जटपुरातील सोनी मार्केटिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:29 PM2018-06-16T22:29:32+5:302018-06-16T22:29:54+5:30

येथील जटपुरा गेटजवळ अगदी मुख्य रस्त्यावर असलेल्या सोनी मार्केर्टिगला शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलांना पाचारण केल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

Fireworks in Sony Marketing | जटपुरातील सोनी मार्केटिंगला आग

जटपुरातील सोनी मार्केटिंगला आग

Next
ठळक मुद्देशार्ट सर्किटने केला घात : आजुबाजुच्या व्यावसायिकांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील जटपुरा गेटजवळ अगदी मुख्य रस्त्यावर असलेल्या सोनी मार्केर्टिगला शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलांना पाचारण केल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
जटपुरा गेटजवळ प्रियदर्शिनी चौक मार्गावर व्यावसायिकांची चाळ आहे. या चाळीतील सोनी मार्केटींगच्या तिसऱ्या माळ्यावर दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी दुकान सुरूच होते. दुकानातील कर्मचारीदेखील पहिल्या आणि दुसºया माळ्यावर काम करीत होते. अचानक तिसºया माळ्यावर आग लागल्याने एकच धावपळ उडाली. कर्मचारी इमारतीबाहेर आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकालाही पाचारण करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस व अग्निशमन विभागाचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सदर आग शार्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या आगीत किती नुकसान झाले, याबाबत अद्याप कळू शकले नाही. दुकानमालक आणि पोलीस यांच्या उपस्थितीत पंचनामा झाल्यानंतरच नुकसानीचा आकडा समजू शकणार आहे. रामनगरचे पोलीस उपनिरीक्षक कापडे, वाघमारे, मोरे, गुरुनुले घटनास्थळावर होते.
मोठा अनर्थ टळला
सोनी मार्केटींग ज्या ठिकाणी स्थित आहे, त्याला लागूनच इतर व्यावसायिकांची मोठमोठी दुकाने आहे. याशिवाय या व्यावसायिक चाळीच्या मागे नागरी वस्तीही आहे. सोनी मार्केटींगला लागलेली आग लवकर आटोक्यात आली नसती किंवा रात्रीच्या सुमारास ही आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने तसे झाले नाही.
वाहतूक खोळंबली
जटपुरा गेट ते प्रियदर्शिनी चौक हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. दिवसभर हजारो वाहने या मार्गावर धावत असतात. याच मार्गावरील दुकानात आग लागल्याने बघ्यांची एक गर्दी उसळून वाहतूक खोळंबली. लगेच पोलिसांचा ताफा आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले. त्यानंतर हा मार्ग काही वेळासाठी रहदारीकरिता बंद करण्यात आला.

Web Title: Fireworks in Sony Marketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.