घोडपेठ ठरले राज्यातील पहिले डिजिटल गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:31 PM2019-02-12T22:31:28+5:302019-02-12T22:31:44+5:30

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे सोमवारी डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून घोडपेठ उदयास आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एक डिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे दिली.

First digital village in the state | घोडपेठ ठरले राज्यातील पहिले डिजिटल गाव

घोडपेठ ठरले राज्यातील पहिले डिजिटल गाव

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : मुंबईच्या डॉक्टरांशी थेट संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे सोमवारी डिजिटल गावाचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव म्हणून घोडपेठ उदयास आले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे एक डिजिटल ग्राम तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे दिली.
घोडपेठ गावातील नागरिकांना टेलिमेडिसीन सेवा, विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणाची सुरुवात, महिलांना सॅनिटरी नॅपकीन तयार करणे व विकण्याची सुविधा आणि उर्जा वाचविणा?्या एलईडी बल्बच्या निर्माण केंद्राची सुरुवात करण्यात आली. याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीच्या डिजिटल दाखल्यांची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली. यासोबतच या गावांमध्ये आता आर्थिक व्यवहारासंदर्भातील प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. गावात सोलार स्ट्रीट लाईट लावले जाणार आहेत. यावेळी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्री, सीएससीचे प्रमुख वैभव देशपांडे, जि. प. सभापती अर्चना जिवतोडे व ब्रिजभूषण पाझारे, भद्रावती पं. स. सभापती विद्या कांबळे, तहसीलदार महेश शितोटे, सरपंच वैशाली उरकुडे, राहुल सराफ, नरेंद्र जिवतोडे, रवी नागापुरे, विजय वानखेडे, गिरीश बन्नोरे उपस्थित होते.
ना. अहीर म्हणाले, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना सुरू करून जनतेला आरोग्यासाठी मोठी उपलब्धी मिळाली आहे. घोडपेठ येथून मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांची एका रुग्णाची थेट बोलणी झाली. त्यांच्यासाठी आॅनलाईन सूचवण्यात आलेल्या औषधोपचाराची ‘डिजिटल प्रिस्क्रिप्शन’ गावकऱ्यांना दाखविले. यापुढे सर्वांनी आरोग्याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून टेलिमेडिसीनद्वारे तपासणी करावी, असेही ना. अहीर म्हणाले. सरपंच वैशाली उरकुडे यांनी गावातील मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. प्रास्ताविक सीएससीचे वैभव देशपांडे, संचालन उद्धव पुरी यांनी केले. आभार सरपंच वैशाली उरकुडे यांनी मानले.

Web Title: First digital village in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.