‘प्रथम पुष्प’ काव्यसंग्रह प्रकाशित
By Admin | Published: October 16, 2016 12:48 AM2016-10-16T00:48:11+5:302016-10-16T00:48:11+5:30
कवीवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अािण अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य पुरस्कार विजेत्या...
चंद्रपूर : कवीवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अािण अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य पुरस्कार विजेत्या सरला बाळकृष्ण नायडू यांचा पहिला काव्य संग्रह ‘प्रथम पुष्प’ याचे प्रकाशन गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरु व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांच्या हस्ते, भारताचे गृहराज्यमंत्री खा. हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली एका समारंभात झाले.
सरला नायडू यांना लहानपनापासूनच लिहिण्याचा नाद होता. परंतु त्यांनी कधीही या कलेला गंभीरतेने घेतले नाही. परंतु त्याच्या मुलांनी उशिरा का होईना, पण आईच्या या गुणाला चालना दिली. त्यांची प्रथम पुस्तिका प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या पुस्तिकेसोबत सरला नायडूच्या काव्यांवर एक गणपती आरती व एक निसर्ग कविताची आॅडीओ रेकार्डींग करुन हे दोन गाण्याचे अलबमसुद्धा विमोचित करण्यात आले. दोन्ही गाण्याला सर्वानी खूप पसंत केले जात असून लवकरच संपूर्ण आठ गाण्याचार् अलबम काढण्यात येणार आहे.