भद्रावतीत आढळला चंद्रपूर जिल्ह्यातील डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण; प्रकृती ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 06:49 PM2021-08-12T18:49:24+5:302021-08-12T18:49:50+5:30

शहरातील फुलेनगर सुमठाणा येथील महिलेला एका महिन्यापूर्वी कोरोना झाला होता.

The first patient of Delta Plus in Chandrapur district was found in Bhadravati; Nature is cool | भद्रावतीत आढळला चंद्रपूर जिल्ह्यातील डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण; प्रकृती ठणठणीत

भद्रावतीत आढळला चंद्रपूर जिल्ह्यातील डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण; प्रकृती ठणठणीत

Next

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती येथे डेल्टा प्लस चा पहिल्या रुग्णाचा अहवाल पॉझेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तातडीची आढावा बैठक  नगर परिषद सभागृह भद्रावती येथे आयोजित केली.

शहरातील फुलेनगर सुमठाणा येथील महिलेला एका महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. या महिलेचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले तब्बल एक महिन्यानंतर रक्ताचा अहवाल डेल्टा प्लस आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे या महिलेची प्रकृती ठणठणीत आहे.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नगर परिषद सभागृह भद्रावती येथे तातडीची बैठक  बोलावली. यावेळी उपविभागीय अधिकारी वरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक चंद्रपूर, अनिल धानोरकर नगराध्यक्ष, महेश शितोळे तहसीलदार, मनीष सिंग वैद्यकीय अधिकारी, सूर्यकांत पिदुरकर मुख्याधिकारी उपस्थित होते. या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असली तरी या परिसरात कॅम्प लावून नागरिकांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे  नागरिकांनी काळजी घेण्याचे गरजअसल्याचे डॉक्टर मनिष सिंग यांनी लोकमतला सांगितले. डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: The first patient of Delta Plus in Chandrapur district was found in Bhadravati; Nature is cool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.