‘द कॉन्शस’ नाट्यप्रयोगाला प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:55 PM2017-12-16T23:55:13+5:302017-12-16T23:56:13+5:30

महानिर्मिती कंपनी अंतर्गत आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्यस्पर्धा चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर अंतर्गत प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडली.

First prize for 'The Conscious' theatrical experiment | ‘द कॉन्शस’ नाट्यप्रयोगाला प्रथम पुरस्कार

‘द कॉन्शस’ नाट्यप्रयोगाला प्रथम पुरस्कार

Next
ठळक मुद्देमहानिर्मिती नाट्य स्पर्धा : अभिनेते भारत गणेशपुरे यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : महानिर्मिती कंपनी अंतर्गत आंतर विद्युत निर्मिती केंद्र नाट्यस्पर्धा चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूर अंतर्गत प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडली. या स्पर्धेत परळी केंद्राने सादर केलेल्या ‘द कॉन्शस’ नाट्यप्रयोगाला प्रथम पुरस्कार जाहीर झाला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून कार्यकारी संचालक (स. व सु) कैलास चिरूटकर, कार्यकारी संचालक (साघिक नियोजन व संवाद) सतिश चवरे, प्रभारी कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रदीप शिंगाडे, सिनेअभिनेता अमित पालकर, उपमुख्य अभियंता नवनाथ शिंदे, राजू घुगे, अनिल आष्टीकर, मधुकर परचाके, गिरीश कुमरवार, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, अग्निशमन अधिकारी शशीकांत पापडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भालचंद्र गायकवाड तसेच परिक्षक जयदेव सोमनाथे, अशोक आष्टीकर, अ‍ॅड. चैताली बोरकुटे आदी उपस्थित होते.
नाट्य स्पर्धेमध्ये चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, भुसावळ, पारस, परळी, नाशिक, मुख्य कार्यालय व पोफळी अशा नऊ नाट्यसंचाचा समावेश होता. उद्घाटनानंतर प्रथमत: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे ‘रंग्या रंगीला रे’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनामध्ये दररोज पाचही दिवस नाट्यप्रेमी कलावंत व प्रेक्षकांची भव्य संख्येत उपस्थिती होती.
शुक्रवारी समारोपीय कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून सिने अभिनेता भारत गणेशपुरे, कार्यकारी संचालक (मास) विनोद बोंदरे, मुख्य अभियंता जयंत बोबडे, मुख्य अभियंता उमाकांत निखारे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुसळे, संचालन कल्याण अधिकारी आनंद वाघमारे यांनी केले.
रंगकर्र्मींचा सत्कार
समारोपीय कार्यक्रमादरम्यान सेवानिवृत्त रंगकर्मी कर्मचाºयांच्या नेपथ्य सहाय्यक दिगंबर इंगळे व नाट्यलेखक कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. नाट्य स्पर्धेमधील नऊ नाट्यसंचापैकी प्रथम क्रमांक ‘द कॉन्शस’ औ.वि. केंद्र परळी, द्वितीय क्रमांक ‘रक्तबिज’ नाशिक औ.वि. केंद्र तर तृतीय क्रमांक ‘अंगार’ खापरखेडा औ.वि. केंद्र यांना. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नाट्य कलावंताना वैयक्तिक पारितोषिक देण्यात आले.

Web Title: First prize for 'The Conscious' theatrical experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.