विदर्भात पहिल्यांदाच आयोजन : दिवाळीच्या सुट्यात शिक्षक, पालकांना मेजवानी
By admin | Published: October 28, 2016 12:46 AM2016-10-28T00:46:05+5:302016-10-28T00:46:05+5:30
महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणेच्या वतीने राज्यस्तरीय बालशिक्षण परिषद आनंदवन येथे ३ ते ५ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे.
चंद्रपूर: महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणेच्या वतीने राज्यस्तरीय बालशिक्षण परिषद आनंदवन येथे ३ ते ५ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘बालशिक्षण शास्त्र आणि व्यवहार’, असा विषय असणार आहे.
समाजात अजूनही बालशिक्षणाबाबत परिपूर्ण माहिती नाही. सदर परिषदेच्या माध्यमातून शिक्षक व पालकांपयर्गंत बालशिक्षणाबाबत शास्त्रशुद्ध माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. महाराष्ट्र बालशिक्षण परिषद बालशिक्षणाच्या प्रसार प्रचारसाठी १९९४ पासून सातत्याने कार्यरत आहे. करिता राज्याच्या कानाकोपऱ्यात अशा प्रकारची अधिवेश्ने आयोजित केली जातात. विदर्भात पहिल्यांदाच या प्रकारचे अधिवेशन होत आहे. हा बहुमान चंद्रपूर जिल्ह्याला मिळाला आहे.
परिषदेचे उद्घाटन विकास आमटे यांच्या हस्ते होणार असून राज्यातील बालशिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे, अलका बियानी, डॉ. दिनेश नेहते यांच्यासह विदर्भातील बालशिक्षणतज्ज्ञांचे मार्गदर्शन व शास्त्रीय दृष्टिकोन, नवोपक्रमाचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे. यासह बालशिक्षणशास्त्र आणि व्यवहार या विषयाधारित संशोधनात्मक निबंध वाचन व समीक्षणही करण्यात येणार आहे. विदर्भात पहिल्यांदाच होत असलेल्या या बालशिण परिषदेचा लाभ दिर्भातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी बालवाडी शिक्षिका, पालक व बालशिक्षणाबाबत शास्त्रीय माहिती जाणण्यास उत्सूक सर्व घटकांनी घ्यावा व आपली नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र बालश्क्षिण परिषद, चंद्रपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष हरीश ससनकर, कार्याध्यक्ष सावन चालखुरे, कोषाध्यक्ष निखिल तांबोळी, सचिव कल्पना डेव्हीड, उपाध्यक्ष सूचरीता काळे, सहसचिव स्मिता ठाकरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)