पहिला झाला शहीद, दुसऱ्यालाही पाठविले पोलीस दलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:18+5:302021-02-08T04:24:18+5:30
माता-पित्याचा केला बल्लारपुरात सत्कार चंद्रपूर : आपल्या एका मुलाला पोलीस दलात पाठविले मात्र नक्षल्यांसोबत दोन हात करताना त्याला वीरमरण ...
माता-पित्याचा केला बल्लारपुरात सत्कार
चंद्रपूर : आपल्या एका मुलाला पोलीस दलात पाठविले मात्र नक्षल्यांसोबत दोन हात करताना त्याला वीरमरण आहे. एक मुलगा गमविल्याचे दु:ख असतानाच दु:ख विसरून दुसऱ्या मुलानेही देशसेवा करावी यासाठी त्यालाही पोलीस दलात पाठवून आपल्या महानतेचा संदेश गडचिरोली येथील एका माता-पित्याने दिला आहे. या माता-पित्यांचा नुकताच बल्लारपूर येथील संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांचा या कार्याला सलाम केला.
येथील संत गाडगेबाबा वाचनालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद कुटुंबाचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार यांच्यासह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील श्रीहरी बंडेवार आणि त्यांची पत्नी वेणू बंडेवार यांचा सत्कार करण्यात आला.
बंडेवार यांचा मोठा मुलगा तुषार बंडेवार पोलीस दलात कार्यरत होता. दरम्यान, नक्षली हल्ल्यात तो शहीद झाला. त्यामुळे बंडेवार कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला. हे दु:ख असतानाच बंडेवार कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलालाही पोलीस दलात पाठविले. या त्यांचा महान कार्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे डोेळे पानावले. यावेळी माजी मंत्री हंसराज अहीर यांनी देशसेवेसाठी आपल्या मुलांना पाठविलेल्या आई-वडिलांचा सत्कार करण्याचे सौभाग्य आपल्याला मिळाल्याचे यावेळी बोलताना सांगितले. यावेळी गिनीज बुक ऑफ बर्ल्ड रेकार्ल्ड प्राप्त आदर्श मित्रमंडळ पुणेचे अध्यक्ष उदय जगताप, सेवा मित्रमंडळाचे शिरीष मोहिते, तुलसीबाग गणेश मंडळाचे नितीन पंडित, चंद्रपूर मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार आदींची यावेळी उपस्थिती होती.