आधी तुझे माझे जमेना अन् आता तुझ्यावाचून करमेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:00+5:302021-09-26T04:30:00+5:30
बॉक्स चारित्र्यावर संशय घेऊन वाद भरोसा सेलकडे आलेल्या एकूण ७२६ तक्रारींपैकी सर्वांत जास्त चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या आहेत. त्यानंतर ...
बॉक्स
चारित्र्यावर संशय घेऊन वाद
भरोसा सेलकडे आलेल्या एकूण ७२६ तक्रारींपैकी सर्वांत जास्त चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या आहेत. त्यानंतर मोबाइलचा सतत वापर करणे, चॅटिंग करणे आदी कारणांनी वाद निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत. मधुर नात्याला गैरसमजाची दृष्ट लागते. यातून वाढत गेलेली दरी कधीकाळी घटस्फोटापर्यंत येऊन ठेपते.
कोट
मागील काही महिन्यांत भरोसा सेलकडे येणाऱ्या तक्रारींत वाढ होत आहे. तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकण्यात येते. त्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात येते. मागील नऊ महिन्यांत १४६ प्रकरणांत समेट घडवून आणण्यामध्ये यश आले आहे. तर आलेल्या ७२६ तक्रारींपैकी ५७२ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
-अश्विनी वाकडे, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल, चंद्रपूर
बॉक्स
भरोसा सेलमधून मिळतो ‘भरोसा’
जिल्ह्यात भरोसा सेलचे कामकाज पोलीस अधीक्षक कार्यालयातून चालते. येथे विविध प्रकारच्या तक्रारी दाखल होत असतात. पती किंवा पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास ते प्रकरण भरोसा सेलकडे येते. येथे समुपदेशनातून त्या प्रकरणाचा निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. काही प्रकरणे न्यायालयाकडे सुद्धा पाठविण्यात येतात.