अज्ञात रोगाने मासे मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:31+5:30

शहराच्या जवळच तलाव असून स्थानिक आदर्श मच्छिमार सहकारी सोसायटीच्या वतीने मासेमारीचा व्यवसायकेला जातो. कोरोनाचे संकट असल्याने सध्या मासेमारी बंद आहे. मंगळवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने काही नागरिकांनी तलावाची पाहणी केली असता अज्ञात रोगाने माशांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तलावातील पाणी हिरवट झाले असून कुणीतरी विषारी रासायनिक पदार्थ मिसळण्याची शक्यता वर्तवित येत आहे.

Fish die of unknown disease | अज्ञात रोगाने मासे मृत्यूमुखी

अज्ञात रोगाने मासे मृत्यूमुखी

Next
ठळक मुद्देभोई समाज संकटात : लॉकडाऊनमुळे मासेमारी बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : अज्ञात रोगाने येथील तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे.
शहराच्या जवळच तलाव असून स्थानिक आदर्श मच्छिमार सहकारी सोसायटीच्या वतीने मासेमारीचा व्यवसायकेला जातो. कोरोनाचे संकट असल्याने सध्या मासेमारी बंद आहे. मंगळवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याने काही नागरिकांनी तलावाची पाहणी केली असता अज्ञात रोगाने माशांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. तलावातील पाणी हिरवट झाले असून कुणीतरी विषारी रासायनिक पदार्थ मिसळण्याची शक्यता वर्तवित येत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने दोन महिन्यांपासून मासेमारी बंद झाली आहे. यावरच उदरनिर्वाह असणाऱ्यांचे हाल सुरू आहेत. अशातच मासे मृत्यूूमुखी पडल्याने ढिवर समाज आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अनेक वर्षांपासून तलावाचे खोलीकरण केले नाही. त्यामुळे तलावात गाळ साचून पाण्याची पातळी खालावली. शहरातील केरकचरा तलावात टाकणे सुरू असल्याने दुर्गंधी पसरली. लॉकडाऊनमूळे भोई समाज आर्थिक संकटात सापडला. त्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी.
-डॉ. राजेश डहारे, सामाजिक कार्यकर्ते, सिंदेवाही

Web Title: Fish die of unknown disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.