आनंदवनच्या भूमीवर ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:31 AM2021-08-24T04:31:50+5:302021-08-24T04:31:50+5:30
वरोरा : महारोगी सेवा समिती संचालित, आनंद निकेतन महाविद्यालय व शारीरिक शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या मैदानावर भारत ...
वरोरा : महारोगी सेवा समिती संचालित, आनंद निकेतन महाविद्यालय व शारीरिक शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या मैदानावर भारत सरकारने सुरू केलेला फिट इंडिया फ्रीडम रन २.० या उपक्रमाच्या प्रेरणेतून ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार मूर्ती पत्रकार वाल्मीक बन, उपप्राचार्य प्रा. राधा सवणे, बाबा आगलावे, दिवाकर टापरे, बाळू पिसाळ, डॉ. सागर वझे, प्रायोजक गोपाल नरुले, गणेश भिवदरे, प्रतीक मांडवगडे, अतुल सारसर आदी उपस्थित होते. पुरुष गटात प्रथम पारितोपिक प्रफुल देवतळे, द्वितीय मंगेश दोडके, तृतीय दिनेश चौधरी, चतुर्थ आदर्श तेलकापल्लीवर, महिला गटात प्रथम डिंपल खाडे, द्वितीय जैनाब खान, तृतीय श्रुतिका तोडसे, चतुर्थ भुमेश्वरी सिंघ विजयी ठरले. या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंनी महाविद्यालयाचा वरिष्ठ खेळाडू ओमकार चट्टे याच्या नेतृत्वाखाली केले. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मृणाल काळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल बाघेले उपस्थित होते. यावेळी पत्रकार वाल्मिक बन यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. संचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी दर्शना कुत्तरमारे तर आभार सायली उपरे, अमित दातारकर यांनी मानले.