रेती खननप्रकरणी पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:05 PM2018-10-13T23:05:46+5:302018-10-13T23:06:23+5:30

बेळगाव रेतीघाटावर अवैध रेती उत्खनन, शासकीय कामात अडथळा, कर्मचाऱ्यांना धमकावणे व जप्त केलेली वाहने रेतीसह पळून नेल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वाहनमालक जाफर पठाण रा. नागभीड, ज्ञानेश्वर अवसरे रा. बेळगाव तर वाहनचालक अक्षय उरकुडे रा. देऊळगाव, अजय कुळमेथे रा बेलगाव, प्रमोद भुरले रा. विलम अशी आरोपींची नावे आहे.

Five accused in sand mining case | रेती खननप्रकरणी पाच अटकेत

रेती खननप्रकरणी पाच अटकेत

Next
ठळक मुद्देमहसूल व पोलीस विभागाची कारवाई : ट्रॅक्टरमालकांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : बेळगाव रेतीघाटावर अवैध रेती उत्खनन, शासकीय कामात अडथळा, कर्मचाऱ्यांना धमकावणे व जप्त केलेली वाहने रेतीसह पळून नेल्याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वाहनमालक जाफर पठाण रा. नागभीड, ज्ञानेश्वर अवसरे रा. बेळगाव तर वाहनचालक अक्षय उरकुडे रा. देऊळगाव, अजय कुळमेथे रा बेलगाव, प्रमोद भुरले रा. विलम अशी आरोपींची नावे आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील रेतीघाटाच्या लिलावाची मुदत ३० सप्टेंबरला संपली असतानाही शुक्रवारी सकाळी बेळगाव नदीपात्रात एमएच ३५ एजी ०१६४, एमएच ३४ एपी ५२०८, एमएच ३४ एपी २६६४ या क्रमांकाचे ट्रॅक्टरवरून रेतीची चोरटी वाहतूक करीत असताना तहसील कार्यालयाच्या पथकाला आढळून आले. या वाहनामध्ये एक ब्रॉस रेती भरलेली होती.
रेती घाटाची मुदत संपली आहे. याशिवाय तिन्ही वाहन चालकाकडे कोणत्याही प्रकारचे रेती खननाची परवानगीपत्र नसल्याने जप्तीनामा करुन सदर वाहने तहसील कार्यालय येथे नेताना एका चारचाकी वाहनातून चार ते पाच माणसे आली. त्यांनी कारवाई करणाºया कर्मचाºयांना जिवे मारण्याची धमकी देऊन रेतीसह ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे.
घुग्घुस येथे रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त
घुग्घुस : परिसरातील नकोडा रेती घाटावरून अवैध रेतीचे खनन करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर नायब तहसीलदारांनी जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली. या रेतीघाटाच्या लिलावाची मुदत संपल्यानंतरही रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारावर नायब तहसीलदार सतीश साळवे यांनी अवैध रेती व माती वाहतूक करणाºयावर कारवाई केली. सदरच्या कारवाईमुळे अवैध रेती खनन करणाऱ्या ट्रॅक्टर मालकामध्ये दहशत पसरली आहे. सदर कारवाई नायब तहसीलदार सतीश साळवे यांच्यासह तलाठी दिलीप पिल्लई, प्रवीण वरभे, विशाल कुरेवार, तलवार यांच्यासह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

ट्रॅक्टरचालक व ट्रॅक्टर्स नेणाऱ्या त्या व्यक्तीविरूध्द आम्ही पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी,.याबाबत आम्हीही तपास करीत आहोत.
-विद्यासागर चव्हाण
तहसीलदार, ब्रम्हपुरी

Web Title: Five accused in sand mining case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.