जिल्हा नियोजनमधून पाच लाखांचा धनादेश सुपूर्द
By admin | Published: January 28, 2016 12:52 AM2016-01-28T00:52:53+5:302016-01-28T00:52:53+5:30
मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरद्वारा येत्या २९, ३० व ३१ जानेवारी २०१६ रोजी येथील पोलीस फुटबॉल ग्राऊंडवर आयोजित...
मुनगंटीवारांचा पुढाकार : संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन
चंद्रपूर : मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपूरद्वारा येत्या २९, ३० व ३१ जानेवारी २०१६ रोजी येथील पोलीस फुटबॉल ग्राऊंडवर आयोजित विदर्भ साहित्य संघाच्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलन सभामंडपाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजनमधून पाच लाखांचा धनादेश प्रशांत आर्वे यांना सुपूर्द केला.
यावेळी आमदार नाना शामकुळे, कार्याध्यक्ष किशोर जोरगेवार, स्वागताध्यक्ष विजय बदखल, मुख्य कार्यवाहक प्रशांत आर्वे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, डॉ.शरद सालफळे, श्रीपाद जोशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.जी. कोरे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर. वायाळ, मनोवेधचे प्रसिध्दी प्रमुख व कला शिक्षक किरण कत्रोजवार, इरफान शेख, डॉ.शाम मोहरकर, डॉ.भानुदास दाभेरे, डॉ. गोपाल मुंदडा, उमाकांत धांडे, संजय ढवस, सुशील कपूर, शाम हेडाऊ व पंकज चीमरालवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजनच्या नाविण्यपूर्ण निधीमधून चंद्रपूर येथे होणाऱ्या ६५ व्या विदर्भ साहित्य संमेलनासाठी पाच लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून मंगळवारी पालकमंत्र्यांच्याच हस्ते मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानला धनादेश सुपूर्द करण्यात आला.
विदर्भ साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर या संमेलनाला हजेरी लावणार आहेत. साहित्य संमेलन दर्जेदार होईल, अशी ग्वाही यावेळी प्रमुख कार्यवाहक प्रशांत आर्वे यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)