एकाच रात्री पाच मद्यतस्करांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:31+5:302021-05-22T04:26:31+5:30

चंद्रपूर : शहरातील रामनगर पोलीस ठाणे हद्दीत मद्यतस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच रात्री तीन कारवाया केल्या. या कारवाईत ...

Five liquor smugglers arrested in one night | एकाच रात्री पाच मद्यतस्करांना अटक

एकाच रात्री पाच मद्यतस्करांना अटक

Next

चंद्रपूर : शहरातील रामनगर पोलीस ठाणे हद्दीत मद्यतस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच रात्री तीन कारवाया केल्या. या कारवाईत १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करून पाच तस्करांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

शहरातील रामनगर चौकात नाकाबंदी करीत पहिली कारवाई करण्यात आली. यावेळी (क्र. एमएच ३४ एम ९९३५) क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली. यावेळी शक्ती संजू शाह (३७, रा. बायपास रोड), लक्ष्मीनारायण पुतान परसराम (३५, रा. अष्टभुजा वॉर्ड), रवींद्र विजय गुजर (३०, रा. अष्टभुजा वॉर्ड) हे तिघे एका वाहनात बसलेले होते. वाहनाची तपासणी केली असता विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहन आणि दारूसाठा असा सुमारे दहा लाख तीन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

रेल्वेस्थानक चौकात दुसरी कारवाई करीत साजिद इसाक कुरेशी (३१, रा. शास्त्रीनगर, वणी) याला अटक केली. कुरेशी हा ऑटोने (क्र. एमएच २९ एम ५९६७) दारूची तस्करी करताना मिळून आला. यावेळी दीड लाख रुपये किमतीची देशी दारू, बिअर असा सुमारे दोन लाख चार हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जनता कॉलेज चौकात तिसरी कारवाई करण्यात आली. चारचाकी वाहनातून (क्र. एमएच ३४ बीबी १४७२) मद्यतस्करी केली जात होती. पोलिसांनी वाहनाची तपासणी करीत एक लाख रुपये किमतीची देशी दारू आणि वाहन असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक ईश्वर रमेश वाघमारे (२६, रा. हॉस्पिटल वॉर्ड, चंद्रपूर) याला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईने अवैध मद्यतस्करांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Five liquor smugglers arrested in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.