3 हजार 600 शेतकऱ्यांनी स्थापन केल्या पाच उत्पादक कंपन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 05:00 AM2022-06-04T05:00:00+5:302022-06-04T05:00:39+5:30

तुकूम येथे शेतकरी उत्पादित मालविक्री केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, प्रकाश देवतळे, नम्रता ठेमस्कर आदी उपस्थित होते. शेती क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उतरत आहेत. शेतमालावर आपणच प्रक्रिया केली तर भविष्यात एक मोठे काम उभे राहील. त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी एक मॉल किंवा जागा उपलब्ध करून देऊ.

Five manufacturing companies established by 3,600 farmers | 3 हजार 600 शेतकऱ्यांनी स्थापन केल्या पाच उत्पादक कंपन्या

3 हजार 600 शेतकऱ्यांनी स्थापन केल्या पाच उत्पादक कंपन्या

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सेंद्रिय पद्धतीने शेती करून ३ हजार ६०० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाच उत्पादक कंपन्यांची स्थापना केली आहे. हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक अभिनव उपक्रम असून शेतकऱ्यांनी उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
तुकूम येथे शेतकरी उत्पादित मालविक्री केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे व्यवस्थापक तृणाल फुलझेले, प्रकाश देवतळे, नम्रता ठेमस्कर आदी उपस्थित होते.
शेती क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उतरत आहेत. शेतमालावर आपणच प्रक्रिया केली तर भविष्यात एक मोठे काम उभे राहील. त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी एक मॉल किंवा जागा उपलब्ध करून देऊ. याबाबत जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. कॅन्सर व इतर रोगांची उत्पत्ती कशी होते हे आपणच लोकांच्या गळी उतरविणे आवश्यक आहे. लोकांपर्यंत जाऊन आपला माल विक्री करा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. प्रास्ताविक चेतन रामटेके, संचालन विजय कोरेवार तर आभार दिलीप फुलबांधे यांनी मानले. 
कार्यक्रमाला  राकेश पेटकर, रामवीर सिंग, आशिष पुण्यपवार यांच्यासह राजू सिद्दम, विनायक डांगे, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, सावलीच्या तालुका कृषी अधिकारी आश्विनी गोडसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

दुकान उघडून बसू नका-जिल्हाधिकारी
पाच कंपन्यांच्या निर्मितीने एक चांगली सुरवात झाली आहे. बदलत्या जगात मार्केटिंगची पध्दत बदलावी लागेल. केवळ दुकान उघडून बसू नये. तर विक्रीकरिता लोकांच्या दारापर्यंत पोहचणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.

या आहेत कंपन्या  
या पाचही शेतकरी उत्पादक कंपन्या सावली तालुक्यातील आहे. यामध्ये  चंद्रपूर – गडचिरोली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी (शेतकरी सभासद १ हजार २००), नास शेतकरी उत्पादक कंपनी मर्या (६००), व्याहाड शेतकरी उत्पादक कंपनी (५००), गेवरा शेतकरी उत्पादक कंपनी (७००) आणि आसोलामेंढा शेतकरी उत्पादक कंपनी (६०० सभासद) समावेश आहे.

 

Web Title: Five manufacturing companies established by 3,600 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी