पाणी पुरवठ्यासाठी पुन्हा पाच टँकर वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:50+5:302021-05-28T04:21:50+5:30
यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, संदीप आवारी, उपायुक्त अशोक गराटे, उपअभियंता विजय बोरीकर, पाणी पुरवठा ...
यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, संदीप आवारी, उपायुक्त अशोक गराटे, उपअभियंता विजय बोरीकर, पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता संजय जोगी उपस्थित होते. शहरातील पाणी टंचाईबाबत १६ एप्रिल रोजी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेतली होती. कोरोना संकटात पाणीटंचाईच्या प्रश्नासंदर्भात दुर्लक्ष होता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ब्रिज कम बंधारा बांधणे, विहिरी व बोअरींगच्या पाण्याची तपासणी करून ते पाणी पिण्यास योग्य की अयोग्य याबाबत फलक लावणे, सार्वजनिक ठिकाणी बोअरींगनजिक रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविणे, मागणीनुसार टॅकर पोहचविणे, आदी विषयावर आढावा घेण्यात आला होता. ज्यादा पाणी मिळवण्यासाठी नळांना टिल्लू पंप लावून पाणी चोरी करणाºया नागरिकांवर कारवाई करण्यासाठी टिल्लूपंप जप्तीची मोहीम विशेष पथकाद्वारे राबविण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.