रेती तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक
By admin | Published: November 17, 2016 01:49 AM2016-11-17T01:49:21+5:302016-11-17T01:49:21+5:30
मंगळवारच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे तहसील कार्यालय व पोलीस पथकाच्या संयुक्त कारवाईत रेती तस्करी
ब्रह्मपुरी : मंगळवारच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे तहसील कार्यालय व पोलीस पथकाच्या संयुक्त कारवाईत रेती तस्करी प्रकरणी चार ट्रक चालक व एक ट्रक मालकास कलम ३८९, ३४ भादंवी अन्वये अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील कोलारी (बेलगाव) येथील घाट लिलाव करण्यात आला असून जावेद इकबाल खॉन रा. भंडारा यांनी सदर घाट घेतला होता. मात्र या रेती घाटावरून विनाटीपीने रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याचा सर्रास प्रकार सुरू होता. गोपनिया माहितीच्या आधारे तहसिलदार विद्यासागर चव्हान, नायब तहसीलदार पुंडेकर व पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर, सहायक पोलीस निरीक्षक खंडाळे यांनी मंगळवारच्या रात्री घाटावर धाड टाकली असता, विनापरवानगीने रेतीचे भरलेले चार ट्रक जात होते. अवैध रेती चोरट्यांना याची चाहूल लागताच ट्रक सोडून ते पसार झाले.
बुधवारला सकाळी ट्रक तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले. तेव्हा ट्रकचे ड्रायव्हर व एक ट्रक मालक तहसिल कार्यालयात आले. त्यानुसार ट्रक चालक संतलाल प्यारे मसराम, मारोती गजानन उईके, महमूद अब्दुल सतार व प्रकाश आत्माराम हुसेन रा. सर्व नागपूर यांच्यासहित ट्रक मालक अशोक पद्माकर स्वामी रा. नागपूर याला अटक केली. चारही ट्रक पोलीस ठाण्यात जप्त असृन या कारवाईत २५ लाखांचे ट्रक व रेती माल जप्त केली आहे. तसेच पोकलँड व घाट मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)