एकाच दिवशी पाच बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 05:00 AM2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:39+5:30

रविवारी पाच बाधितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या ४६ झाली असून चंद्रपूर ४२, तेलंगणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन बाधितांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमूर तालुक्यातील शिवरा येथील ४० वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ३० आॅगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते.

Five victims died on the same day | एकाच दिवशी पाच बाधितांचा मृत्यू

एकाच दिवशी पाच बाधितांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनवे २६२ रुग्ण आढळले : चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ३९०३ बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी मृत पावलेल्याचा आतापर्यंतचा हा आकडा सर्वाधिक आहे. यासोबतच जिल्ह्यात नव्याने २६२ पॉझिटिव्ह आढळले असून एकूण बाधितांची संख्या ३ हजार ९०३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एक हजार ८५० बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात दोन हजार ७ बाधितांवर उपचार सुरू आहे.
रविवारी पाच बाधितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या ४६ झाली असून चंद्रपूर ४२, तेलंगणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन बाधितांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमूर तालुक्यातील शिवरा येथील ४० वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ३० ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने ५ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला आहे.
दुसरा मृत्यु ७० वर्षीय विकास नगर वरोरा येथील पुरुष बाधिताचा आहे. १ सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. तिसरा मृत्यू हा ६५ वर्षीय तुकुम चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा आहे. ३ सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयार भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया आजार होता. त्याचबरोबर,चवथा मृत्यु केळझर तालुका मूल येथील ८६ वर्षीय पुरूष बाधिताचा आहे. या बाधिताला २६ ऑगस्टला भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने रविवारी त्याचा मृत्यू झाला आहे. यासोबतच ९० वर्षीय दादमहल चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. ५ सप्टेंबरला बाधिताला भरती करण्यात आले होते. रविवारी बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातीस सर्वाधिक १४३ बाधित आढळले आहे. यासोबतच उर्वरित बाधित हे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील आहेत.

ग्रामीण भागातील बाधित
भद्रावती तालुक्यातील संताजी नगर, गणपती वार्ड गौराळा, भोज वार्ड, पाटाळा, माजरी कॉलरी परिसर, घोडपेठ, आंबेडकर वार्ड, शास्त्रीनगर, एकता नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील सराफा लाईन, जिजामाता वार्ड, बोर्डा भागातून बाधित रविवारी पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील जनकापूर, भिकेश्वर, मिंडाळा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातून हनुमान नगर, लाडज, इंजिनिअरिंग कॉलनी परिसर, बोरगाव, बेटाळा, तोरगाव, खरकाडा, शेष नगर, हनुमान नगर, गांधीनगर भागातून बाधित पुढे आले आहे.बल्लारपूर येथील रेल्वे वार्ड, बालाजी वार्ड, श्रीराम वार्ड, गोरक्षण वार्ड, आंबेडकर वार्ड, सरदार पटेल वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मूल तालुक्यातील दिघोरी, मारोडा, राजगड, केळझर, चितेगांव या गावातून बाधित पुढे आले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द, बोर्डा भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक, नेरी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चंद्रपुरातील नवे बाधित
चंद्रपूर शहरातील वडगाव, बालाजी वार्ड, महेश नगर, गुरुद्वारा परिसर, देवई-गोविंदपुर तुकूम, महाकाली वार्ड, बाजार वार्ड, कृष्णा टॉवर, शिवनगर तुकूम, जल नगर वार्ड , मित्र नगर, रामनगर, भानापेठ वार्ड, महाकाली वार्ड, घुटकाळा वार्ड, गजानन बाबा नगर, दाद महल वार्ड, सावरकर नगर, भिवापूर वॉर्ड, छोटा बाजार परिसर, हनुमान नगर तुकुम, दाताळा रोड परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, अंचलेश्वर गेट परिसर, नगिनाबाग, वार्ड नंबर १ दुर्गापूर, गंज वार्ड, सिस्टर कॉलनी परिसर, बालाजी वार्ड, बिनबा वार्ड, बाबुपेठ या भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

Web Title: Five victims died on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.