पाच वर्षांत ४,२१५ जणांना कुत्र्यांनी घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:29 AM2021-08-23T04:29:53+5:302021-08-23T04:29:53+5:30

मंगल जीवने बल्लारपूर : घरी पाळणारा कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी आहे, हे सर्वश्रुत आहे. असे असले तरी शहरात ...

In five years, 4,215 people have been bitten by dogs | पाच वर्षांत ४,२१५ जणांना कुत्र्यांनी घेतला चावा

पाच वर्षांत ४,२१५ जणांना कुत्र्यांनी घेतला चावा

Next

मंगल जीवने

बल्लारपूर : घरी पाळणारा कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी आहे, हे सर्वश्रुत आहे. असे असले तरी शहरात मोकाट फिरणारे कुत्रे नागरिकांना चावण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नगर प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. यामुळे शहरातील लावारीस श्वानांची संख्या दुपटीने वाढली असून पाच वर्षांत तब्बल ४ हजार २१५ जणांना बेवारस कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्टपर्यंत आठ महिन्यात ८८२ जणांना कुत्र्यांनी जखमी केले आहे. यंदा कुत्रे चावण्याची संख्या जास्त आहे.यामुळे शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे.

पावसाळा सुरु झाला की कुत्र्यांची गर्दी दररोज रस्त्यावर दिसते. मटण, चिकन मार्केटमध्ये अशा कुत्र्यांचा नेहमीच वावर असतो. चिकन, मटणाचे मांस रस्त्यावर फेकले जाते. ते लावारीस कुत्र्यांचे खाद्य बनते व त्यामुळे कुत्रे हिंसक बनतात. मुख्य म्हणजे नगर परिषदेच्या मागे असलेल्या मटण मार्केटमध्ये हे वास्तव आहे,परंतु नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे लावारीस कुत्र्यांची संख्या या परिसरात जास्त आहे.

बल्लारपूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून कुत्र्याच्या नियंत्रणासाठी दोन वर्षाआधी निर्बिजीकरण मोहीम राबविण्यात आली, परंतु या मोहिमेचा काही फायदा झाला नाही. उलट कुत्र्यांची संख्या दुप्पट झाली. त्यानंतर कुत्रे नियंत्रणासाठी नगर परिषदेने कुठल्याच उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे पालिकेने राखलेल्या मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना जाच सहन करावा लागत आहे. या वर्षात ऑगस्ट अखेरपर्यंत मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात ८८२ जण जखमी झाले आहेत; मात्र यामध्ये मृत्यू झालेल्यांची व अपघातातील जखमींची नोंदच नाही. नाहीतर ही आकडेवारी याहीपेक्षा मोठी असू शकते.

बॉक्स

या भागात अधिक त्रास

शहरातील वस्ती विभाग, नगर परिषद चौक, पेपर मिल गेटजवळ, टेकडी विभाग, डेपो बस स्टॅन्ड या परिसरात लावारीस कुत्र्यांचा प्रचंड त्रास वाढला आहे.

कोट

नगर परिषदेने अप्रत्यक्षरित्या शहरातील मोकाट कुत्र्यांना अभय दिले आहे. या कुत्र्यांची संख्या दुपटीने वाढत आहे. रात्री रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनावर ही कुत्रे धावून गेल्यामुळे रोज अपघात होत आहेत. कुत्र्यांच्या दहशतीमुळे अनेकांना आपला मार्ग बदलावा लागत आहे, परंतु याची दखल प्रशासन घेत नाही. हे दुर्दैव आहे.

-सुमित डोहने,सामाजिक कार्यकर्ता,बल्लारपूर .

कोट

बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद अशा श्वानांचे निर्बिजीकरण करणार आहे. पुढील आठवड्यात याबाबतची निविदा प्रक्रिया सुरु होईल. तसेच नगर परिषदेने मोकाट कुत्रे पकडून ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्याचे देखभालीचीसुद्धा निविदाची प्रक्रिया सुरु आहे.

-विजयकुमार सरनाईक,मुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपूर.

कोट

येथील ग्रामीण रुग्णालयात दर आठवड्यात कुत्रा चावल्याच्या २५, ३० जणांच्या नोंदी होतात. अशा रुग्णांनी तीन तासांच्या आत रुग्णालयात दाखल व्हावे. याशिवाय रेबिजचे पाच इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. पागल व रेबिजग्रस्त कुत्र्यांपासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.

-सुरेश मेश्राम,आरोग्य सहायक,बल्लारपूर

बॉक्स

बल्लारपुरात कोणत्या वर्षी किती जणांना चावा

२०१७ - ६९९

२०१८ - ८२५

२०१९ - ८१७

२०२० - ९९२

२०२१ - ८८२

220821\20210819_071639.jpg

रस्त्यावर मोकाट कुत्रे

Web Title: In five years, 4,215 people have been bitten by dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.