गोवरी ग्रामपंचायतीवर १५ वर्षांनंतर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:30 AM2021-02-11T04:30:36+5:302021-02-11T04:30:36+5:30

वेकोलीच्या कुशीत वसलेल्या गोवरी ग्रामपंचायतीवर १५ वर्षे भाजपची सत्ता होती. मात्र, यंदा प्रथमच ग्रामविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतरही ...

Flag of Gram Vikas Aghadi on Gowri Gram Panchayat after 15 years | गोवरी ग्रामपंचायतीवर १५ वर्षांनंतर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

गोवरी ग्रामपंचायतीवर १५ वर्षांनंतर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

Next

वेकोलीच्या कुशीत वसलेल्या गोवरी ग्रामपंचायतीवर १५ वर्षे भाजपची सत्ता होती. मात्र, यंदा प्रथमच ग्रामविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतरही सरपंचपदासाठी चांगलेच राजकारण झाले. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्ष निरंजन गोरे व ग्रामविकास अधिकारी संजय तुरारे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत गोवरी ग्रामपंचायतीवर शिवसेना, शेतकरी संघटना व काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीचा झेंडा फडकला. जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या गावात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. सरपंचपदाच्या निवडणुकीत आशा उरकुडे यांची सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली. तर, उपसरपंचपदी उमेश मिलमिले यांची निवड झाली आहे. तर, सदस्य म्हणून चेतन बोभाटे, भीमराव मिठुवार, शंकर बोढे, सिद्धार्थ कास्वटे, नीलिमा देवाळकर, रेखा पाचभाई, सुरेखा सोयाम, नीलम कोसुरकर, मनीषा वांढरे यांची वर्णी लागली आहे.

Web Title: Flag of Gram Vikas Aghadi on Gowri Gram Panchayat after 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.