विजेच्या लपंडावाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:56 AM2020-12-11T04:56:51+5:302020-12-11T04:56:51+5:30

विजेच्या लपंडावाने रब्बी हंगाम अडचणीत सावली : तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास ...

With a flash of lightning | विजेच्या लपंडावाने

विजेच्या लपंडावाने

Next

विजेच्या लपंडावाने

रब्बी हंगाम अडचणीत

सावली : तालुक्यातील ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी शिवारात विद्युत तारा लोंबकळत आहेत. थोडी हवा आली तरी वीज पुरवठा खंडित होतो. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. कृषीपंपधारक शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करीत आहेत. परंतु विजेअभावी हंगामाची कामे रखडळली आहेत.

बसस्थानक परिसरात

जनावरांचा ठिय्या

मूल : येथील बसस्थानक परिसरात मोकाट जनावरांचा वावर आहे. त्यामुळे प्रवाशी व वाहतूकदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही जनावरे अगदी मध्यभागी बसत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.

अवैध प्रवासी

वाहतूक बोकाळली

पोंभुर्णा : तालुक्यातील स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक वाढली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक केली जात आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाच्ी शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्लास्टिक पिशव्यांना

आळा घालावा

राजुरा : शहरात दिवसेंदिवस प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. बाजार परिसर व अन्य ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या देण्यात येतात. या पिशव्या कुठेही टाकून देण्यात येत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

वणी- घुग्घुस मार्गावर

अवैध जडवाहतूक

घुग्घुस : वणी मार्गावर जडवाहतूक मोठ्या संख्येने सुरु आहे. त्यामुळे अपघातही घडले आहे. याच मार्गावर वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. त्यामुळे कामगारांची सतत या रस्त्यावर वर्दळ असते. रस्त्याची दुरुस्ती करून जडवाहतुकीवर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.

प्रवासी निवाºयांअभावी नागरिकांची ताटकळ

गोंडपिपरी : तालुक्यातील बहुतांश मोठ्या गावांमध्ये बस जाते. पण, बस थांब्यावर प्रवासी निवारे नाहीत. नागरिक व विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागते. तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव तयार करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.

पथदिवे दुरूस्त

करण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील इंदिरानगर व काही परिसरातील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. नागरिकांना अंधाराचा त्रास होत आहे. काही खांबाचे दिवे बदलविण्यात आले तर फुटलेले तसेच आहेत. मनपाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.

निराधारांना योजनांचे

अर्ज प्रलंधित

चंद्रपूर : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांंना तातडीने निकाली काढण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे चंद्रपूर तालुक्यातील शेकडो अर्ज प्रलंबित आहेत. त्या अर्जाचा विचार झाला नाही. गोरगरीब व अनाथ लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी योजना राबविल्या जातात. मात्र अधिकारी व कर्मचाºयांच्या उदासिनतेमुळे समस्या कायम आहे.

पीक विम्याच्या

रकमेची प्रतीक्षा

सिंदेवाही : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांनी पीक विमा काढला होता. पण, विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अतिपावसामुळे खरीप हंगामातील धानाचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. उत्पन्नात कमालीची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे.

बेरोजगार युवक

युवतींमध्ये निराशा

नागभीड : कला शाखेतील हजारो विद्यार्थी तृतीय श्रेणीने उत्तीर्ण होतात. या शाखेतील पुढचे शिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. शासनाने विविध विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकर भरतीवर बंदी घातली. शेकडो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. कोरोना काळात रोजगाराअभावी निराशा वाट्याला येऊ लागली आहे.

निधीअभावी रस्त्यांचे

बांधकाम रखडले

ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू असून १४ व्या वित्त आयोगाचा निधी वापरला जात आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदाराने कामे थांबविल्याचे दिसून येते. पंचायत समितीच्या संबंधित अधिकाºयांनी यासंदर्भातील अहवाल जिल्हा परिषदकडे पाठवून निधीची तरतूद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कृषी विभागातील रिक्त पदांमुळे योजना रखडल्या

चंद्रपूर : कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहेत़ त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाºयांची दमछाक होत आहे़ राज्य व केंद्र शासनाने शेतीसाठी अनेक योजना सुरू केल्या़ तसेच जिल्हा परिषदच्याही विविध योजना आहेत़ पण, शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही़ त्याचा परिणाम अंमलबजावणीवर झाला आहे़ पीक पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरावी, अशी मागणी शेतकºयांनी केली.

Web Title: With a flash of lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.