त्या सदनिका १७ वर्षापासून धूळखातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:25 AM2021-02-15T04:25:25+5:302021-02-15T04:25:25+5:30
उपयोगात आणण्याची गरज कोरपना : लाखो रुपये खर्चून तहसील कर्मचाऱ्यांसाठी कोरपना येथे सदनिका बांधण्यात आल्या. मात्र निर्मितीपासून या ...
उपयोगात आणण्याची गरज
कोरपना : लाखो रुपये खर्चून तहसील कर्मचाऱ्यांसाठी कोरपना येथे सदनिका बांधण्यात आल्या. मात्र निर्मितीपासून या सदनिका उपयोगात न आणल्याने बेवारस पडल्या आहेत.
त्या उपयोगात आणाव्यात, अशी मागणी होत आहे. १७ वर्षांपूर्वी या सदनिकाची निर्मिती झाली. परंतु शहराच्या बाहेर व स्मशानाच्या जवळ असल्याने या ठिकाणी आजतागायत कुठलाही कर्मचारी वास्तव्यास गेला नाही. परिणामी, या सदनिका दुरवस्थेकडे वाटचाल करीत आहेत. या परिसरात संरक्षण भिंत उभारल्यास या सदनिका उपयोगात आणल्या जाऊ शकतात. तसेच या स्थानी अन्य कार्यालयेसुद्धा थाटली जाऊ शकतात. मात्र याकडे संबंधिताचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी विस्तीर्ण जागा उपलब्ध आहे. त्यामुळे सुसज्ज परिसर उपलब्ध आहे. याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.