चिखलापारचा पूर ओसरला, नागरिक पोहोचले गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:59 AM2019-08-28T00:59:45+5:302019-08-28T01:00:23+5:30
चिखलपार हे १९५ लोकसंख्येचे गाव पाण्याने वेढल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी गाव गाठून सरंपच व गावकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. सुरक्षेकरिता सर्व ग्रामस्थाना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यात रविवारीच्या रात्रीपासुन झालेल्या संततधार पावसाने नदी, नाले, तलाव तुडूंब भरले. त्यामुळे चिखलापार गावाला बेटाचे स्वरूप आले होते. खबरदारी म्हणून प्रशासनाने चिखलापारवासींना चिमूर येथील शेतकरी भवनात स्थलांतरित केले होते. मंगळवारी सकाळी उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे व अन्य कर्मचाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करत चिखलापार येथील पूरग्रस्तांना गावात पोहचविले.
चिखलपार हे १९५ लोकसंख्येचे गाव पाण्याने वेढल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी गाव गाठून सरंपच व गावकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. सुरक्षेकरिता सर्व ग्रामस्थाना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले होते. त्यापैकी ३६ ग्रामस्थांना उपविभागीय अधिकारी बेहरे यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे बोटीने रात्री ७.३० वाजतापासून रात्रर १०.०० वाजेपर्यंत पोलीस निरिक्षक स्वप्निल धुडे व पोलीस कर्मचाºयांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. चिखलापार वासीयांची भोजन, औषध व निवासाची व्यवस्था केली होती.
गावकºयांना पिण्यासाठी कॅनचे पाणी
गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे पाणी गढुळ झाल्याने त्यात ब्लिचिंग टाकून नमूने तपासण्याकरिता पाठवण्यात आले. त्यामूळे पाण्याच्या कॅन गावात पाठविल्या आहेत. ग्रामस्थांच्या भोजनाकरिता धान्यही पाठविण्यात आले. शुद्ध पाण्याची व्यवस्था होईपर्यंत पाण्याच्या कॅन पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी बेहरे यांनी दिली.
निवासस्थानीच भरली जि. प. शाळा
येथे जि.प. ची दोन शिक्षकी शाळा आहे. शाळेत ७ विद्यार्थी असून त्यात एकच विद्यार्थिनी आहे. पूर परिस्थितीने ग्रामस्थांना शेतकरी भवन चिमूर येथे आणल्याने शाळा या भवनातच भरविण्यात आली. मुख्याध्यापक किशोर नागदेवते, मंगला साटोणे हे अध्यापनाचे कर्तव्य बजावत आहेत.