चंद्रपुरातील पूररेषा नकाशा बदलवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:55 AM2020-12-04T04:55:40+5:302020-12-04T04:55:40+5:30
शहरातील ३० ते ४० टक्के घरे नदीला लागून असलेल्या भागातच वसली आहेत. यापूर्वी केलेल्या हजारो बांधकामांना महानगरपालिकेने परवानगी दिली. ...
शहरातील ३० ते ४० टक्के घरे नदीला लागून असलेल्या भागातच वसली आहेत. यापूर्वी केलेल्या हजारो बांधकामांना महानगरपालिकेने परवानगी दिली. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भूखंड खरेदी करून या जागेवर घर बांधण्याच्या तयारीत आहेत. परंतु, पूररेषा चुकीची ठरविण्यात आल्याने याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसणार आहे. पूररेषा आखणी करताना २५ ते १०० वर्षांच्या पुराचा इतिहास बघितला जातो. मात्र, शहरातील पूर अहवाल तयार करताना केवळ कागदोपत्री कार्यवाही झाली. प्रत्यक्षात वडगाव प्रभागातील लक्ष्मी नगर तसेच आकाशवाणी परिसरातील विविध ठिकाणी कधी मोठा पूर आला नाही. मात्र, या भागालाही पूरग्रस्त निळ्या रेषेच्या आत टाकण्यात आल्याचे निवेदनातून नमुद केले आहे.