शिवनी-वासेरा परिसरात दारूचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:30 AM2021-08-22T04:30:40+5:302021-08-22T04:30:40+5:30
परिसरातील वासेरा, शिवनी, शिरसाळा, मोहाळी, नलेश्वर, गडबोरी, रामाळा आदी गावांत अवैद्य दारू विक्री जोरात सुरू आहे. गावागावात २० ते ...
परिसरातील वासेरा, शिवनी, शिरसाळा, मोहाळी, नलेश्वर, गडबोरी, रामाळा आदी गावांत अवैद्य दारू विक्री जोरात सुरू आहे. गावागावात २० ते २५ अवैध दारू विक्रेते सक्रिय असल्याची ओरड आहे. शिवनी, शिरसाळा, वासेरा, मोहाडी, नलेश्वर गावाशेजारील जंगल परिसरात मोहफुलाच्या दारू भट्ट्या आहेत. तिथेच दारू काढली जाते. गावागावात अवैध दारू विक्री होत असल्यामुळे एकाच ग्लासने शेकडो मद्यपी दारू पित असतात. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावागावात कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी जामशाळा (नवीन) येथील महिलांनी सभा बोलावून दारूबंदीबाबत चर्चा केली. या गावात २० वर्षांपासून दारूबंदी असताना चार महिन्यांपासून गावात दोन दारू विक्रेते अवैद्य दारू विकत असताना दिसून येत आहेत. यामुळे पोलिसांप्रती रोष व्यक्त केला जात आहे.