पुरावर पूर, विदर्भात भर‘पूर’, कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दिली ओढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 05:50 AM2023-07-29T05:50:59+5:302023-07-29T05:51:40+5:30

वर्धा, पैनगंगा, इरई नद्या फुगल्या, चंद्रपूरला वेढा

Flood upon flood, flood in Vidarbha, flood in Konkan, West and North Maharashtra | पुरावर पूर, विदर्भात भर‘पूर’, कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दिली ओढ

पुरावर पूर, विदर्भात भर‘पूर’, कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात दिली ओढ

googlenewsNext

चंद्रपूर/मुंबई : विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्याला शुक्रवारी पुन्हा अतिवृष्टीचा फटका बसला. गुरुवारी रात्रीपासूनच्या मुसळधार पावसामुळे पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली असून शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसाने वर्धा, पैनगंगा व इरई नदीला पूर आला. पुराचा तडाखा चंद्रपूर शहरासह कोरपना, राजुरा, गोंडपिपरी, बल्लारपूर या तालुक्यांना बसला आहे. पुरामुळे चंद्रपूरला जोडणारे सर्व पूल व मार्ग पाण्याखाली आले आहेत, तर इरई धरणातील जलसाठ्यात अचानक वाढ झाल्याने तीन दरवाजे एक मीटरने उघडले आहे. परिणामी, चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या पुरामुळे पश्चिम भागातील वस्त्या जलमय झाल्या आहेत. सहारा काॅलनी व आरवट येथील घरांमध्येही पाणी शिरल्याने ३५ जणांना सुरक्षितस्थळी हलविले, तर ३८० जणांना पुराच्या भीतीने स्थलांतरित केले आहे.

जोर ओसरणार  

मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना शनिवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. आता राज्यभरातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. २९ जुलैपासून ५ ऑगस्टपर्यंत मुंबईसह कोकण व सह्याद्रीचा घाटमाथा वगळता विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.

अधिकारी कारसह नाल्यात गेला वाहून 

पोंभुर्णा (जि. चंद्रपूर) येथून आक्सापूरकडे येत असताना मोठी बेरडीजवळील नाल्यावर पोंभुर्णा येथील सहायक पुरवठा निरीक्षक तथा गोंडपिपरी येथील सीएमआर शासकीय धान्य गोदामचे प्रभारी निरीक्षक अमित गेडाम (वय ३५) हे कारसह शुक्रवारी सकाळी वाहून गेले. 

खोटे पत्र, शाळांना सुट्टी 

चंद्रपूरमधील शाळांना २८ जुलैला सुट्टी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले पत्र व्हायरल झाले. त्यानंतर शाळांनी सुट्टी जाहीर केली. मात्र, हे पत्र खोटे असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांची धांदल उडाली. 

Web Title: Flood upon flood, flood in Vidarbha, flood in Konkan, West and North Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.