वर्धा, पैनगंगा नद्यांना पूर; तीन तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला

By राजेश भोजेकर | Published: July 23, 2023 09:46 AM2023-07-23T09:46:44+5:302023-07-23T09:48:45+5:30

२२ गावच्या नदी लगत शेतशिवारात व गाव वेशित पाणी शिरले आहे.

Flooding of Wardha, Panganga rivers; Three talukas lost contact with Chandrapur | वर्धा, पैनगंगा नद्यांना पूर; तीन तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला

वर्धा, पैनगंगा नद्यांना पूर; तीन तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला

googlenewsNext

चंद्रपूर : वर्धा, पैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला. वर्धा नदीच्या बल्लारपूर मार्गावरील पुलावरून आता पाणी वाहने सुरू झाले आहे. वर्धा नदीचा भोयगाव मार्गावरील पूल रात्रीच बुडाला होता. 

पैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी कोरपना तालुक्यातील अंतरगाव गावात शिरले. तसेच परसोडा, रायपूर, पारडी ,अकोला, कोडशी बू,/ खू , जेवरा, पिपरी, तुलसी, मेहंदी, वनोजा , सांगोडा, कारवाई,  इरई, भारोसा आदी सह २२ गावच्या नदी लगत शेतशिवारात व गाव वेशित पाणी शिरले आहे. नवनिर्मित कोरपणा - मुकुटबन मार्गावरील पारडी पुलाचे निर्मिती कार्य करणाऱ्या जेसीपी व बांधकाम साहित्य बुडाले गेले आहे. भोयगाव - धानोरा,  वनसडी - अंतरगाव , पार्डी - खातेरा, कोडशी - पिपरी आदी मार्ग बंद झालेले आहे.

Web Title: Flooding of Wardha, Panganga rivers; Three talukas lost contact with Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस