पूर ओसरला आता मदतीच्या महापुराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:59+5:302021-07-26T04:25:59+5:30
कोरपना : बुधवारपासून पडलेल्या दोन दिवस संततधार पावसाने कोरपना तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत ...
कोरपना : बुधवारपासून पडलेल्या दोन दिवस संततधार पावसाने कोरपना तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तालुक्यातील कोरपनासह पारडी, परसोडा, कोठोडा, मेहंदी, जेवरा, अकोला, रायपूर, कन्हाळगाव, रुपापेठ, सावलहिरा, जांभूळधरा, खैरगाव, कमलापूर, धानोली, पिपरडा, चिंचोली, कारगाव, येरगव्हाण, निजामगोंदी, झूलबर्डी, अंतरगाव, पिपरी, तुळशी, कोडशी, नारडा, भारोसा, इरई, सांगोडा, कारवाई, सोनुर्ली, शेरज, माथा , लोणी, वनोजा येथील शेतशिवारातील कापूस, सोयाबीन आदी पिकांचे नदी, नाल्याच्या पुरामुळे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांवर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ठाकले आहे. आधीच शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत असताना निसर्गाच्या या संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतातील पिकांचे सर्वेक्षण करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यात यावर्षी ३८ हजारांहून अधिक हेक्टरवर शेत पिकाची लागवड आहे.