‘सलाम राणी हिराई’ अंतर्गत गोंडराजे बिरशहाच्या समाधीवर पुष्पअर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:45+5:302021-02-15T04:24:45+5:30

इको-प्रोचे आयोजन : युवकांनी आदर्श घेण्याची गरज चंद्रपूरः शहरात गोंडकालीन ऐतिहासिक वास्तू असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या ...

Flower offering on the tomb of Gondraje Birshah under 'Salam Rani Hirai' | ‘सलाम राणी हिराई’ अंतर्गत गोंडराजे बिरशहाच्या समाधीवर पुष्पअर्पण

‘सलाम राणी हिराई’ अंतर्गत गोंडराजे बिरशहाच्या समाधीवर पुष्पअर्पण

Next

इको-प्रोचे आयोजन : युवकांनी आदर्श घेण्याची गरज

चंद्रपूरः शहरात गोंडकालीन ऐतिहासिक वास्तू असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत इको-प्रो संस्थेचे सदस्यांनी पुष्प अर्पण करून कार्यक्रम साजरा केला.

प्रेमाच्या दिवसानिमित्त पाश्चिमात्यकरणाचे अनुकरण न करता विद्यार्थ्यांना योग्य संदेश देता यावा म्हणून दरवर्षी गोंडराजांच्या समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोविडमुळे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता आले नाही.

गोंडराजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्यूनंतर या वास्तूचे सुंदर बांधकाम केले. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवनातील सुंदर आकर्षक अशी वास्तू बांधून न थांबता राज्यकारभार योग्यरीत्या सांभाळला. अनेक मंदिराचा जीर्णोध्दारसुध्दा केला आहे. राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतीहासात नोंदवीला गेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातून आपल्या पतीप्रति असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तू खऱ्या अर्थाने आपला वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातून गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माण सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून राणीने एक आदर्श घालुन दिलेला आहे. राणी हिराई आणि गोंडराजे बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्यूनंतरही अजरामर झाले आहे. ऐतिहासिक वास्तू संवर्धनकरिता पुढाकार घेण्याची गरज आहे असे मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले.

सलाम राणी हीराई कार्यक्रम करिता इको-प्रो चे नितीन रामटेके, संजय सब्बनवार, सुनील पाटील, सुधीर देव, जयेश बैनलवार, मनीष गावंडे, कपील चौधरी, अमोल उट्टलवार, पूजा गहुकर, दुर्गेश्वरी वायकर, सारिका वाकुडकर पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Flower offering on the tomb of Gondraje Birshah under 'Salam Rani Hirai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.