पतंग उडवा; पण जरा जपून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:12 AM2019-01-04T00:12:49+5:302019-01-04T00:13:42+5:30

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे.

Fly kite; Just a little bit! | पतंग उडवा; पण जरा जपून !

पतंग उडवा; पण जरा जपून !

googlenewsNext
ठळक मुद्देआनंदावर विरजण नको : वीजवाहिन्यांमुळे उद्भवू शकतो धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या संक्रांतीमुळे पतंगप्रेमी आनंदले आहेत. पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने सर्वत्र थाटली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगाची गर्दी वाढत आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्न येऊ नये, याकरिता महावितरणने सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडविताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. वीजवाहिन्यांमुळे धोका उद्भवू शकतो. त्यामुळे लहान बालकांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनी पतंग उडवावी; पण जरा जपून..
पतंग उडविण्याचा मोह लहानापासून तर मोठयापर्यत सर्वांनाच होतो व हा मोह त्यांना टाळता येत नाही. मात्र शहरी भागात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाच्या वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडविताना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकतात. अश्यावेळी काहीजण तो अडकलेला पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात.
अशाप्रसंगी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असते. त्यामुळे अडकलेला पतंग काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या जीवावर उठू शकतो. असा अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो. हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा धक्का बसण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढताना एका तारेवर दुसज्या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्कीट होण्याची, प्राणांतिक अपघात होण्याची तसेच वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकारही घडू शकतो. संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून या उत्सवाला गालबोट लागू नये, याकरिता पतंग उडविताना पुरेपूर सावधानता बाळगावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
महावितरणतर्फे ११ जानेवारी ते १७ जानेवारीदरम्यान वीज सुरक्षा सताह पाळण्यात येणार आहे. जीव ही लाखमोलाची देणगी असून सुरक्षेच्या माधमातून अपघातापासून बचाव करता येणे शक्य आहे.
त्यामुळे वीज सुरक्षा सप्ताह महावितरणच्या सर्व विभागीय, उपविभागीय व शाखा कार्यालयात पाळण्यात येणार आहे.
धातूमिश्रित मांजा वीज प्रवाहित
सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता उपलब्ध आहे. हा मांजा वीज प्रवाहित तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहीत्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहित होऊन प्राणांतिक अपघाताची दाट शक्यता आहे.

हे लक्षात ठेवा
वीज तारांवार अडकलेला पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
तारामध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.
तारांत अडकलेला पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.
पतंग उडविणाऱ्या पाल्यांकडे पालकांनी लक्ष ठेवावे.

Web Title: Fly kite; Just a little bit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kiteपतंग