शेतकरीपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:58 PM2018-03-19T23:58:00+5:302018-03-19T23:58:00+5:30

राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्र फाऊंडेशनतर्फे अन्नदात्यांसाठी सोमवारी चंद्रपुरातील गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता निंबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता झाली.

Food and Agriculture Movement | शेतकरीपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

शेतकरीपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

Next
ठळक मुद्देकिसानपुत्र फाऊंडेशन : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त किसानपुत्र फाऊंडेशनतर्फे अन्नदात्यांसाठी सोमवारी चंद्रपुरातील गांधी चौकात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता निंबू पाणी पाजून आंदोलनाची सांगता झाली.
याप्रसंगी किसानपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, प्रदीप बोबडे, विजय भोगेकर, हरीश ससनकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, किशोर जोरगेवार, नगरसेवक सचिन भोयर, संदीप आवारी, सुरेश महाकुलकर, अशोक नागापुरे, डॉ. ईश्वर कुरेकर, बळीराज धोटे, प्रा. प्रमोद उरकुडे, वसंत उमरे, संतोष ताजणे, नितीन बन्सोड, सुनील भोयर, उमाकांत धांडे, प्रा. सुरेश चोपणे, दीपक जेऊरकर, आदींची उपस्थिती होती.
यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १९ मार्च १९८६ ला सामूहिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली अधिकृत शेतकरी आत्महत्या. त्यानंतर आजतागायत लाखो शेतकºयांनी गळफास घेत आत्महत्या केली. मात्र शासनाचे शेतकºयांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात विविध सामजिक संघटनांच्या पदाधिकाºयांचा सहभाग होता.
वरोरा येथेही शहीद योगेश डाहुले स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी नेते मोरेश्वर टेमुर्डे, नितीन मत्ते, शरद जीवतोडे, शरद मडावी, सुधाकर रोहणकर, नामदेव जीवतोडे, अंकुश निब्राड, बंडू झाडे, मनीष शिरसाटे, दिलीप नागराळे, बंडू भोंगळे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी होते.

Web Title: Food and Agriculture Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.