उकिरड्यावरचे अन्नच भरते त्याच्या पोटाची खळगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:33 AM2021-09-04T04:33:45+5:302021-09-04T04:33:45+5:30
राजुरा : शहरात कधी कोणती घटना घडेल, याचा नेम नाही आणि भूक माणसाला काय करायला लावेल, याचाही नेम नाही. ...
राजुरा : शहरात कधी कोणती घटना घडेल, याचा नेम नाही आणि भूक माणसाला काय करायला लावेल, याचाही नेम नाही. राजुरा तालुका पत्रकार संघाच्या बाजूला वॉर्डातील नागरिक कचरा टाकतात. त्यामध्ये काही रात्रीचे उरलेले अन्न टाकतात. शुक्रवारी सकाळी त्या फेकलेल्या कचऱ्याजवळ एक ५० वर्षांचा माणूस बसून दिसला. प्रस्तुत प्रतिनिधीने गाडी थांबवून पाहिले, तर अतिशय विदारक चित्र दिसले. उकिरड्यावर टाकलेले अन्न आणि कणीस तो खात होता.
प्रस्तुत प्रतिनिधीने त्याच्याजवळ जाऊन विचारले असता, तो काही सांगत नव्हता. त्याला भूक लागली होती. काही खायला पैसे नव्हते. त्याला जेवणासाठी पैसे दिले. त्यानंतर, तो तिथून निघून गेला. समाज कितीही जपण्याचा प्रयत्न केला, तरी आज देशात अठराविश्व दारिद्र्य आहे. एक वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. आजचे दृश्य जीवाला हेलावणारे आहे.
030921\img_20210903_151533.jpg
फोटो