अन्न सुरक्षा आर्मीचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:20 PM2018-03-26T23:20:01+5:302018-03-26T23:20:01+5:30

The Food Security Army's pilot project will be implemented in the district | अन्न सुरक्षा आर्मीचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबविणार

अन्न सुरक्षा आर्मीचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबविणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : नव्या प्रयोगाची जाणून घेतली माहिती

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : सीमेवर लढणारे सैनिक तांत्रिक, यांत्रिक आणि कल्पक दृष्टीने कायम सज्ज असतात. शेतीच्या संदर्भातील आवाहनेदेखील अनेक प्रकारची असतात. त्यामुळे सीमेवरील सैन्याप्रमाणेच सर्व आव्हानांना पेलणारी प्रशिक्षित अन्न सुरक्षा आर्मी तयार करुन त्यांच्यामार्फत नफ्यात चालणारी शेती करण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प चंद्रपूर व सिंधूदुर्ग जिल्ह्यात राबविण्याची शासन तयारी करीत आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शास्त्रज्ञांच्या या नव्या प्रयोगाची रविवारी चंद्रपूर येथे माहिती जाणून घेतली.
येथील नियोजन भवन येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळ कृषी विद्यापीठाचे त्रिसूर संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. जयकुमारन यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करुन उत्पादन वाढविण्यासाठी अन्न सुरक्षा सैन्यदलाची संकल्पना समजावून सांगितली. केरळमध्ये या पध्दतीचा प्रयोग करण्यात आला आहे. या संकल्पनेनुसार धानाची किंवा अन्य शेती करताना कमी वेळ, कमी खर्च आणि मोठया क्षेत्रावरील मशागतीला गती देता येते. या संकल्पनेनुसार धानाच्या प्रत्येक ४०० हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी यंत्रापासून कापणी यंत्रापर्यंत विविध यंत्रांचा वापर करण्यासाठी ५० उत्साही तरुणांना निवडून त्यांना सैन्यदलामध्ये देण्यात येणाऱ्या कडक व प्रगत प्रशिक्षणाप्रमाणे प्रशिक्षण देऊन त्यांची एक सुसज्ज तुकडी तयार करण्यात यावी, असे प्रस्तावित आहे. ही अन्न सुरक्षा आर्मी तयार झाल्यावर प्रत्यक्ष किमान ४०० हेक्टर शेतावर जावून रोवणीपासून कापणी व तणस व्यवस्थापनापर्यंत संबंधित शेतकºयांना मदत करेल. हा एक प्रशिक्षीत व्यवसाय असून या प्रशिक्षणाचा वापर ही आर्मी स्वत:च्या अर्थार्जनासोबतच अन्य शेतकºयांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी वापरतील. यावेळी केरळमध्ये महिलासुध्दा अनेक यंत्रांचा वापर करुन शेती करीत असल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जय जवान जय किसान या घोषणेप्रमाणे प्रशिक्षित शेतकरी जवान व प्रत्यक्ष मेहनत करणारा शेतावरील शेतकरी या दोघांची परस्पर पुरकता वाढवून अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी संकल्प करण्याचा हा प्रयत्न आहे.
सदर संकल्पना केरळ व अन्य काही ठिकाणी राबविण्यात आली आहे. या मागील अर्थकारण, व्यावसायिकता व उपयोगिता लक्षात घेऊन प्रथम काही भागात हा प्रयोग करण्याचा शास्त्राज्ञांचा सल्ला आहे. याबाबत चंद्रपूर व सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यामध्ये अशा पध्दतीच्या यांत्रिकीकरणाच्या शेतीला पुढाकार देता येऊ शकते काय, याबाबतची ही चाचपणी आहे. शेतीमध्ये प्रचंड मेहनतीसोबत आता कल्पकतासुध्दा महत्त्वाची आहे, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: The Food Security Army's pilot project will be implemented in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.